31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब थोरात 'कोरोना'तून बरे झाले, जनतेसाठी केल्या महत्वाच्या सुचना

बाळासाहेब थोरात ‘कोरोना’तून बरे झाले, जनतेसाठी केल्या महत्वाच्या सुचना

टीम लय भारी

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढतेय, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हा कोरोचा हॉटस्पॉट ठरला आहे. तिसर्‍या लाटेची सुरुवात देशामध्ये झाली असताना महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यात मंत्रिमंडळातील अनेक मंत्री कोरोच्या विळख्यात सापडले आहेत, काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट द्वारे सांगितले आहे(Balasaheb Thorat recovered from ‘Corona’, important tips).

त्यांनी आता नुकतेच ट्विट करून सांगीतले आहे की, माझा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सोमवारपासून माझ्या नियमित कामकाजास सुरुवात करेल. या सर्व काळात माझ्या आरोग्यासाठी आपण दिलेल्या सदिच्छा मला ऊर्जा देणाऱ्या ठरल्या. अशी माहिती देत बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आश्वासन दिले आहे.

बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात 7 सेवा सोसायटींच्या निवडणुका बिनविरोध

उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, भाजपच्या माजी नगरसेवकाला नवी मुंबईत ठोकल्या बेड्या

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या काळजी वाढवणारी आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. आपण एकत्रित प्रयत्नांतून या संकटावर मात करू अशा प महत्त्वाच्या सूचना मंत्री अबालसाहेब थोरात यांनी जनतेला केल्या आहेत.

आमदार प्रकाश आवाडे यांना पराभवाचा धक्का

Maharashtra minister Balasaheb Thorat tests positive of Covid-19

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी