27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटेंना तर डॉ. आण्णासाहेब शिंदे...

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटेंना तर डॉ. आण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार रणजितसिंह डिसलेंना जाहीर

सहकारातील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार (Award) अ‍ॅड. माधवराव कानवडे यांना जाहीर

बुधवारी 13 जानेवारीला संगमनेरमध्ये पुरस्कार सोहळा

टीम लय भारी
 
संगमनेर : सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, समाजसेवा, पत्रकार, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणार्‍या व्यक्तींसाठी दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार जेष्ठ विचारवंत व संपादक संजय आवटे यांना, डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना तर आदर्श सहकार व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हा थोरात कारखान्याचे माजी चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे यांना देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक आ. डॉ. सुधीर तांबे व बाजीराव पाटील खेमनर यांनी यशोधन संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पुरस्कारांचे वितरण बुधवार 13 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता मालपाणी लॉन्स येथे होत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री मा. ना. भूपेश बघेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

या पुरस्कारांची निवड उल्हास लाटकर, प्रा. बाबा खरात, प्राचार्य केशवराव जाधव, विजयआण्णा बोर्‍हाडे, उत्कर्षाताई रुपवते, डॉ. राजीव शिंदे यांनी केली आहे. संगमनेर तालुका व नगर जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. आण्णा साहेब शिंदे जयंती समितीच्या वतीने व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी