30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeव्यापार-पैसाशेतमालाच्या निर्यातीमध्ये यंदा मोठी वाढ; गहू, तांदळासह या वस्तूंना परदेशातून मागणी

शेतमालाच्या निर्यातीमध्ये यंदा मोठी वाढ; गहू, तांदळासह या वस्तूंना परदेशातून मागणी

यंदा भारताच्या निर्यातीत कृषी (Agricultural) क्षेत्राचा वाटा वाढल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसारचालू आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान कृषी आणि कृषी संबधीत वस्तूंची निर्यांत (Exports) तब्बल 11.97 टक्क्यांनी वाढली असून कृषी क्षेत्राशी निगडीत निर्यात गेल्या सात महिन्यांमध्ये 30.21 अब्ज डॉलर्सपर्यंत गेली आहे. भारतातून परदेशात होणाऱ्या कृषी मालामध्ये गहू, तांदूळ, कच्चा कापूस, एरंडेल तेल, कॉफी आणि फळांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सन 2021-22 वर्षामध्ये कृषी आणि कृषी क्षेत्राशी निगडीत वस्तुंची एकुन निर्यात 20 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राशी निगडीत निर्यात 50.24 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. कृषी क्षेत्राशी निगडीत निर्यात मागील वर्षात 41.86 अब्ज डॉलस इतकी होती.

कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, सन 2020 च्या जूलै महिन्यात केंद्र सरकारने किसान रेल सेवा सुरू केली. ही सुविधा सुरु झाल्यामुळे शेतमालाच्या रसद पुरवठ्यात कमालीची वाढ झाली. या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत देशभरात एकुन 167 रेल्वे मार्गावर किसान रेल चालविण्यात आल्या. त्याच बरोबर देशभरातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या इलेक्ट्रॉनिक-नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट (ई-नाम) शी जोडल्या गेल्या आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत ई-नाम वर जवळपास 1.72 कोटी शेतकरी आणि 2.13 लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच 4,015 शेतकरी उत्पादक संघटनांनी देथील नवीन योजने अंतर्गत नोंदणी केली आहे.

हे सुद्धा वाचा
दिव्यांगांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत उपचार, विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

VIDEO :कोण आहेत ठाणे पोलीस दलातील ‘कलेक्टर’?

खासदार गिरीश बापट यांची शरद पवारांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

काय आहे ई-नाम प्रणाली
ई-नाम प्रणाली ही एक ईलेक्ट्रॉनिक कृषी व्यापाराशी निगडीत प्रणाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या प्रणालीशी जोडून राष्ट्रीय स्तरावर शेतमालाशी निगडीत बाजारपेठ निर्मान केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील बाजार समित्या जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यातील शेतकऱ्याला इतर कोणत्याही राज्यात आपला शेतमाल विकणे सहज शक्य होते. ई नाम प्रणालीमुळे मध्यस्थ, दलाल यांची मक्तेदारी संपवून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचा उद्देश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी