30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeव्यापार-पैसापार्किंगची कटकट संपली; आता घर बसल्या बुक करता येणार पार्किंग स्लॉट

पार्किंगची कटकट संपली; आता घर बसल्या बुक करता येणार पार्किंग स्लॉट

मुंबई महानगरातील वाढत्या वाहनांमुळे निर्माण झालेल्या पार्किंगच्या टंचाईतून मुंबईकरांची सुटका करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. BMC कडून लवकरच एक अ‍ॅप विकसित केले जाणार असून मुंबईकरांना घराबाहेर पडण्यापूर्वीच पार्किंग स्लॉट बुक करता येईल. कुठेतरी जाण्यापूर्वी गाडी कुठे पार्क करायची या विचाराने प्रत्येकजण चिंतेत पडतो. ही समस्या लक्षात घेऊन ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने (GCC) ‘GCC स्ट्रीट स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन लॉन्च केले आहे. यामुळे शहरातील रिक्त पार्किंग स्लॉट शोधणे आणि बुकिंग करणे शक्य झाले आहे. राज्यातही अशी संकल्पना राबविण्यासाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे लवकरच ही कल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहीती समोर आली आहे.

सध्या पार्किंगसाठी खासगी जागांसह पे अँड पार्किंग व पालिकेची उपलब्ध 32 वाहनतळेही अपुरी पडत आहेत. त्यामुळे मुंबईतील खासगी सोसायट्या, ‘म्हाडा’, सरकारी-खासगी कार्यालयांच्या मोकळ्या जागेत पार्किंगची जागा पालिकेकडून निश्चित करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर ऑन रोड व ऑफ रोड पार्किंगची देखील सुविधा पालिकेकडून दिली जाईल.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले की, हा एक मोठा प्रकल्प असून पालिकेचे सर्व उपलब्ध पार्किंग लॉट्स आणि एमएमआरडीए, पोर्ट ट्रस्ट, रस्त्यालगत, खासगी गृहनिर्माण संस्थांच्या पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा एकाच सॉफ्टवेअर इंटरफेस अंतर्गत आणल्या जातील. परदेशात. पोहोचण्यापूर्वी पार्किंग स्लॉट बुक केला जातो त्याचप्रमाणे मुंबईकरांनाही आगाऊ पार्किंग लॉट बुक करता येणार आहे. याशिवाय मानवी हस्तक्षेपाशिवाय सर्व पेमेंट ऑनलाईन केले जाऊ शकते.

पादचारी नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. अयोग्यरित्या पार्क केलेल्या वाहनांमुळे ट्रॅफिक जॅम होतो, पादचाऱ्यांनाही त्रास होतो. संपूर्ण परिसरात कुठे पार्किंग उपलब्ध आहे याची माहिती वाहनचालकांना मिळाल्यास ते त्याचा वापर सहज करू शकतील.

  • या  अ‍ॅपमुळे 1 लाख 25 हजार 510 वाहने ऑन रोड, ऑफ रोड पार्क करता येतील.
  • पार्किंग अ‍ॅपमुळे मुंबईबाहेर जाताना आपली कार किंवा कोणतेही वाहन पार्क केल्यानंतर वाहन चोरीला जाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
  • पार्किंगसाठी ऑनलाईनअ‍ॅप आल्यानंतर मुंबईकरांना ते किती वेळासाठी गाडी बुक करणार तसा स्लॉट बुक करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा: 

गॅस सिलेंडरपासून GST पर्यंत; 1 मे पासून होणार मोठे बदल, जाणून घ्या

सुकन्या समृद्धी योजना: मुलीचे भविष्य होणार अधिकतम् सुरक्षित; जाणून घ्या कसे

भारतीय पोस्ट ऑफिसची लखपती करणारी ग्रामसुरक्षा योजना

Book a parking slot before leaving the house, Bmc will launch new Parking slot app in mumbai

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी