27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeव्यापार-पैसागॅस सिलेंडरपासून GST पर्यंत; 1 मे पासून होणार मोठे बदल, जाणून घ्या

गॅस सिलेंडरपासून GST पर्यंत; 1 मे पासून होणार मोठे बदल, जाणून घ्या

एप्रिल महिना संपायला फक्त एकच दिवस शिल्लक आहे. 1 मेपासून  सामान्य लोकांसाठी अनेक नवीन नियम लागू केले जातील, म्हणून मे येण्यापूर्वी आपल्याला या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जे तुमच्या आर्थिक खर्चाशी निगडित असतात. यामध्ये बँकिंग (Banking), गॅस सिलेंडर (LPG Cylinder) यासंबंधी अनेक नियम असे आहेत जे लोकांच्या थेट खिशावर परिणाम करतात, म्हणून आपल्याला हे सर्व नियम माहित असणे आवश्यक आहे. अनेकदा महिन्याच्या सुरुवातीला काही वस्तूंच्या किमती वाढतात. मे महिन्याची सुरुवातही अनेक मोठ्या बदलांसह होणार आहे. अशा परिस्थितीत हा महिना तुमच्यासाठी कोणत्या प्रकारची सुरुवात घेऊन येणार आहे. ते जाणून घेऊया.

LPG च्या दरात बदल
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. 1 एप्रिल रोजी सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 91.50 रुपयांची कपात केली होती. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती एका वर्षात 225 रुपयांनी कमी झाल्या आहेत. 1 मे रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल दिसू शकतात.

गॅस सिलेंडरपासून GST पर्यंत; 1 मे पासून होणार मोठे बदल, जाणून घ्या

PNB ग्राहकांसाठी मोठा बदल
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. नवे नियम 1 मे पासून लागू होणार आहेत. एटीएममधून पैसे काढताना पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात शिल्लक नसल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर बँकेकडून 10 रुपयांसह जीएसटी दंड म्हणून आकारला जाईल. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाइटवर नोटीस जारी करताना ही माहिती दिली आहे.PNB ग्राहकांसाठी खूशखबर, बँकेने केला 'हा' मोठा बदल; करोडो ग्राहकांची चांदी

म्युच्युअल फंड KYC
बाजार नियामक संस्था SEBI ने म्युच्युअल फंड कंपन्यांना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याच ई-वॉलेटचा वापर केला आहे याची खात्री करण्यास सांगितले आहे, ज्यांचे KYC पूर्ण आहे. हा नियम 1 मेपासून लागू होणार आहे. यानंतर गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतात. केवायसीसाठी, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, मोबाइल नंबर आणि बँक तपशील द्यावा लागेल. या सर्व तपशीलांसह, केवायसीसाठी एक फॉर्म भरावा लागेल.

म्यूचुअल फंड में ग्रोथ और डिविडेंड ऑप्शन क्या होते हैं? किसमें करें निवेश - growth and dividend options in mutual funds

GST नियमांमध्ये बदल
1 मे पासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमानुसार, आता 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी, व्यवहाराची पावती 30 दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) अपलोड करावी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी अद्याप कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही.

GST Council Meet Begins: 28% GST on Online Gaming, States' Compensation; Key Agendas Today

हे सुद्धा वाचा: 

सुकन्या समृद्धी योजना: मुलीचे भविष्य होणार अधिकतम् सुरक्षित; जाणून घ्या कसे

भारतीय पोस्ट ऑफिसची लखपती करणारी ग्रामसुरक्षा योजना

अल्प बचत योजना: पॅन आधार अनिवार्य; अन्यथा चालू खाते बंद होईल!

May 1st big changes on market rate, changes on gas cylinder, GST, Bank Rule, ATM

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी