35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्राईमसीबीआयने जीएसटी अधिक्षकावर 25 लाख लाच मागितल्याचा केला गुन्हा दाखल

सीबीआयने जीएसटी अधिक्षकावर 25 लाख लाच मागितल्याचा केला गुन्हा दाखल

केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाच्या अधीक्षक आणि त्याचाशी सम्बधित दोन जणांवर ऐका व्यापाराकडे 25 लाख रुपये लाच मगितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यांच्यासाठी सिबीआयने ट्रॅप लावला होता.मात्र,आरोपी पळून जाण्याचा यशस्वी झालेत.

तक्रारदार यांचा बुलीयनचा व्यवसाय आहे.20 एप्रिल रोजी त्यांच्या दुकानावर केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाचे अधीक्षक धिरेंद्र कुमार आणि त्याच्या टीमने धाड टाकली.थोडावेळ चौकशी केल्यावर तक्रारदार व्यापारी यांना जीएस्टीच्या चर्चगेट समोरील कार्यालयात घेऊन गेले.तिथे त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर टॅक्स चोरीच्या प्रकरणात कारवाई नको असल्यास, अटक टाळायची असल्यास एक कोटी रुपये लाच मागितली.तुमच्या जवळच्या मित्राला फोन करा आणि पैसे घेऊन यायला सांगा अस कुमार तक्रारदार यांना म्हणाला. तक्रादार यांनी असमर्थता दाखवल्यावर लाचेची रक्कम 50 लाख करण्यात आली.आणि त्यातले 25 लाख आजच रात्री ऑफीसच्या खाली द्यायचे आणि उरलेली रक्कम काही दिवसात द्यायची, अस कुमार याने तक्रारदार यास सांगितलं.

त्यानुसार तक्रारदार याने आपल्या मित्राला फोन करून सर्व सांगितलं.मात्र,तक्रारदार यांना लाच द्यायची नव्हती.यामुळे तक्रारदार यांच्या मित्राने सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआय अधिकाऱ्यांनी मग सापळा लावण्याचीत तयारी सुरू केली.आणि कुमार सांगतो तसं करा,अस सांगितलं.

यानंतर तक्रारदार यांचा मित्र 25 लाख रुपये घेऊन जी एसटी कार्यालयात पोहचला.यावेळी कुमार याने ही रक्कम मी आता घेणार नाही.ही रक्कम दादर येथे एक व्यक्ती येईल त्याच्याकडे द्या, अस म्हणून सर्व दादरला निघाले. कुमार याने फोन करून त्याचा ज्वेलर मित्र अमृतलाल संखाले याला लाचेचे पैसे घ्यायला बोलावलं.यानंतर एका गाडीत तक्रारदार यांचा मित्र दादरच्या दिशेने निघाला. त्यांच्या मागच्या गाडीत कुमार आणि तक्रारदार होते.या दोन्ही गाडीच्या मागे काही अंतरावर सीबीआयची गाडी होती.तक्रारदार यांच्या मित्राची गाडी दादरला पोहचली.त्याला ज्वेलर्स अमृतलाल याने इशारा केला.मग तक्रारदार यांच्या मित्राने पैसे अमृतलाल याच्याकडे दिले.अमृतलाल सोबत त्याचा नोकर बबन हा होता.पैसे घेऊन ते निघून गेले.मग कुमारने ही तक्रारदार याला सोडलं.मात्र, यावेळी सीबीआयच्या टीम ला पोहचण्यास उशीर झाला.सर्व आरोपी तो पर्यंत पळून गेले होते.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच : प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केला समितीचा निर्णय

वेशव्यावसायातून दोन परदेशी महिलांची सुटका

पार्किंगची कटकट संपली: आता घर बसल्या बुक करता येणार पार्किंग स्लॉट; पालिकेचा नवा उपक्रम

याबाबत सीबीआयने धिरेंद्र कुमार,अमृतलाल संखाले त्याचा नोकर बबन यांच्या विरोधात लाच मगितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.आणि तपास सुरू केला आहे.

A case against GST Superintendent for demanding a bribe of 25 lakhs
CBI registered a case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी