27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeव्यापार-पैसानिर्लज्ज नेत्यांनो, जनाची व मनाची असेल तर शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहा

निर्लज्ज नेत्यांनो, जनाची व मनाची असेल तर शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहा

लोकसभा निवडणुक आता चौथ्या टप्प्यात पोहचली असून लय भारीची टीम ही पोहचली आहे लासलगाव मध्ये. लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांदा उत्पादकांसाठीची मोठी बाजारपेठ असून येत्या 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची येते सभा होणार असून याच पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी तेथील शेतकरी मतदारांशी संवाद साधला आहे.

लोकसभा निवडणुक आता चौथ्या टप्प्यात पोहचली असून लय भारीची टीम ही पोहचली आहे लासलगाव मध्ये. लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांदा उत्पादकांसाठीची मोठी बाजारपेठ असून येत्या 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची येते सभा होणार असून याच पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी तेथील शेतकरी मतदारांशी संवाद साधला आहे(Indian Farmers revolting against PM Modi). लय भारीशी संवाद साधताना, भारती पवार आणि मोदीने शेतकरी धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत व्यक्त करत खदखद व्यक्त केली. कांद्यवरची निर्यात बंदी शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरलीच, शिवाय खत किंवा शेतीविषयक सामग्री खरेदी करताना त्यावर लागणारा GST म्हणजे शेतकऱ्यांना लुटल जातंय. शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. हिंदुत्व वादाच्या मुद्द्यावर भाजपात गेलेल्या एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाविषयी काहीच करावस वाटत नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळेस “राम कृष्ण हरी,वाजवा तुतारी”, असं म्हणत शेतकऱ्यांनी त्यांचा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे लय भारीशी बोलताना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी