34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईपोलिस बदली दरबारात प्रथमच कौन्सिलिंग पद्धत; रोखठोक भूमिकेमुळे नगर पोलिसांची पंचाईत!

पोलिस बदली दरबारात प्रथमच कौन्सिलिंग पद्धत; रोखठोक भूमिकेमुळे नगर पोलिसांची पंचाईत!

पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, बदल्यांमध्ये पारदर्शीता व सुसूत्रता यावी, म्हणून यंदा पहिल्यांदाच एसपी राकेश ओला यांनी कौन्सिलिंग पद्धत वापरली. बदल्यांमध्ये मध्यस्थ न ठेवता ओला यांनी बदली दरबार भरवून कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार तसेच पर्याय देवून समोरासमोर बदली प्रक्रिया पार पाडली. पोलिस अधीक्षक यांच्या रोखठोक भूमिकेमुळे शिफारशीलाल कर्मचाऱ्यांची नक्कीच कोंडी झाली असून, अनेकांना पंसतीचे ठिकाण मिळाले आहे. मात्र यंदा एसपींनी बदली दरबार भरविल्याने काही कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

जिल्हा पोलिस दलातील पोलिस अंमलदार व पोलिस चालक यांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया मंगळवारी (दि.25) येथील पोलिस मुख्यालयाच्या हॉलमध्ये सुरू झाली. मात्र, पहिल्या दिवशी बदल्या पूर्ण न झाल्याने बुधवारी (दि. 26) रात्री उशिरापर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. सुरूवातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलिस हवालदार या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर पोलिस नाईक, शिपाई व चालक यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली, बदली पात्र पोलिस अंमलदार यांना समोर बोलावून त्यांनी दिलेल्या तीन पर्यायांचा एसपींनी आधी विचार केला. दिलेल्या पर्यायानूसार बदली देणे शक्य नसल्यास राकेश ओला यांनी कौन्सिलिंग पद्धत वापरून बदलीचे ठिकाण दिले. प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतः पोलिस अधीक्षक ओला यांनी विचारणा करून बदली प्रक्रिया पार पाडली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे शाखेत स्थान मिळविण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी खूप आटापिटा केला. बहुतांश अंमलदारांनी गुन्हे शाखेत जाण्यासाठी अर्जात पहिली पंसती दिली होती. मात्र, राकेश ओला यांनी एकाही कर्मचाऱ्यांला अद्याप गुन्हे शाखेत स्थान दिले नाही. दुसरीकडे वर्षांनुवर्षे गुन्हे शाखेत बस्तान बसविलेल्या 30 ते 35 अंमलदारांना एसपी ओला यांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे. तर काही पोलिस कर्मचाऱ्यांना पसंतीचे ठिकाण न मिळाल्याने सुमारे 100 कर्मचाऱ्यांनी पसंतीचे ठिकाण मिळावे, यासाठी पुन्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे विनंती केल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा :

LIVE: मन की बात @100

प्रियांका गांधी पंतप्रधान मोदींवर उखडल्या; ज्याला लेकींची काळजी नाही तो देशाची काय काळजी करणार?

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचाच जलवा; चारही बाजार समित्यांमध्ये वर्चस्व

Nagar Police transfer used Counseling Methods by SP Rakesh Ola, SP Rakesh Ola

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी