33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्यापार-पैसातुमचे पॅन कार्ड लवकरच होणार निष्क्रिय; जाणून घ्या कारण

तुमचे पॅन कार्ड लवकरच होणार निष्क्रिय; जाणून घ्या कारण

प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड वापरकर्त्यांना सांगितले आहे की, जर पॅन आणि आधार अद्याप लिंक झाले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. 31 मार्च 2023 ही पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विटरवर दिली आहे.

प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड वापरकर्त्यांना सांगितले आहे की, जर पॅन आणि आधार अद्याप लिंक झाले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. 31 मार्च 2023 ही पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विटरवर दिली आहे. अशा परिस्थितीत लिंक न केल्यास 1 एप्रिल 2023 पासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याचा अर्थ तुम्ही पॅन कार्ड वापरू शकणार नाही. आयकर विभागाने ट्विटरवर लिहिले आहे की कलम 1961 अंतर्गत सर्व पॅन कार्डधारकांना आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर कोणी हे काम 31 मार्च 2023 पर्यंत केले नाही तर तो 1 एप्रिलपासून पॅन कार्ड वापरू शकणार नाही. शेवटची तारीख जवळ आली आहे आणि आजच लिंक करावी.

दंड भरूनही लिंक करता येणार नाही
आता पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी दंड भरावा लागेल (पॅन कार्ड पेनल्टी), पण 31 मार्चनंतर लिंक करायला गेल्यास, दंड भरूनही हे काम होणार नाही. मात्र, हे काम केल्यास दंड भरावा लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने आता आपला पॅन आधारशी लिंक केला तर त्याला 1,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. कारण दंड न भरता लिंक करण्याची तारीख निघून गेली आहे.

हे सुद्धा वाचा

खडसे यांच्या पत्नी पराभूत; जळगाव दूध संघात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण विजयी 

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी, महाजन यांचे पीए जळगाव दूध संघात विजयी; खडसे-महाजन यांची प्रतिष्ठा पणाला!

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल : नितीन गडकरी

पॅन कार्ड सोबत आधार लिंक कसे करावे
पॅन कार्डशी आधार लिंक करण्यासाठी, तुम्ही प्रथम आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट दिली पाहिजे. तुमच्याकडे वैध पॅन क्रमांक, वैध आधार क्रमांक, वैध मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. आता दंड भरण्यासाठी तुम्हाला ई-पेमेंटवर टीआयएन पर्याय निवडावा लागेल आणि नॉन-टीडीएसमध्ये ‘प्रोसीड’ पर्याय निवडावा लागेल. पॅन, मूल्यांकन वर्ष (2023-24), पेमेंटची पद्धत (नेट बँकिंग / डेबिट कार्ड), पत्ता, ईमेल आणि मोबाइल नंबर यांसारखे इतर आवश्यक तपशील देखील प्रविष्ट करा. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला 4 ते 5 दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

4-5 दिवसांनंतर, तुमचा पॅन तुमच्या आधारशी लिंक करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या. येथे ई-फायलिंगसाठी लॉगिन करा आणि डॅशबोर्डवर जा, लिंक आधार टू पॅन पर्यायाखाली, लिंक आधार वर क्लिक करा. तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

पॅन निष्क्रिय असल्यास काय करावे
जर 31 मार्च 2023 पर्यंत PAN आधारशी लिंक केले नसेल, तर तुम्ही जिथे पॅन अनिवार्य असेल तिथे ते वापरू शकणार नाही. तसेच, तुम्ही तुमचे पॅन कार्ड बँक खाते, डिमॅट खाते इत्यादींसाठी वापरू शकणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी