28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनगौतमी पाटीलमुळे लावणी नृत्यांगनाना घरीच डान्स करण्याची वेळ

गौतमी पाटीलमुळे लावणी नृत्यांगनाना घरीच डान्स करण्याची वेळ

सबसे कातील गौतमी पाटील… गौतमी पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे. आपल्या अदाकारीने तिने लहानांपासून वृद्ध व्यक्तींचे मने जिंकली आहेत. त्यामुळे मुलाचा वाढदिवस असो किंवा बैलाचा वाढदिवस असो कुठल्याही समारंभाला गौतमीचा डान्स कार्यक्रम आयोजित केला जातो. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशी ही महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलमुळे राज्यातील प्रसिद्ध नृत्यांगना घरीच डान्स करत आहेत.

गौतमी पाटील हिच्या अदाकारीने तरुणांना घायळ केले असताना अनेक वर्ष विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पैसे कमवणाऱ्या नृत्यांगनावर घरीच डान्स करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळेच अनेक नृत्यांगनावर आता घरात खिडकीजवळ बसून रील करण्याची वेळ आलेली आहे. गौतमी पाटील ही बीभत्स डान्स करते अशी तक्रार मध्यंतरी वर्ष लावणी नृत्य सादर करणाऱ्या नृत्यांगनानी केली होती. असे असताना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला तरुण मंडळीसह महिलाही जात आहेत. त्यामुळेच की काय गेल्या काही वर्षात हेटाळणीचा विषय झालेल्या गौतमी पाटीलचा डान्स अनेकांना पहावासा वाटत आहे.

गौतमी पाटीलने खरे तर गेल्या काही वर्षात सगळ्या नृत्यांगनाना घरीच बसवले आहे. मुलाचा वाढदिवस असो किंवा बैलाचा वाढदिवस असो कुठल्याही समारंभाला गौतमीचा डान्स कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यासाठी ती घासघशीत मानधन घेते. अनेक प्रसिद्ध नृत्यांगना तिच्या नावाने बोटे मोडतात, पण गौतमी केवळ कामाकडे लक्ष देते. बालपणापासून संघर्षमय आयुष्य वाट्याला येऊनही ती कधीही कडवट बोलत नाही.

हे सुद्धा वाचा
सचिन तेंडुलकरांसाठी बच्चू कडूंची भीकपेटी
धनंजय मुंडेंच्या जनता दरबारला तुडुंब गर्दी !
चंद्रशेखर बावनकुळेंना सुप्रिया सुळेंनी फटकारले; पत्रकारांबाबतच्या वक्तव्याचे पडसाद उमटले !

नुकतीच गौतमी पाटीलने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘जे सेलिब्रिटी आहेत, ते तुला सेलिब्रिटी मानतात का? कधी त्यांना तू भेटली आहेस?’ यावर गौतमी म्हणाली की, ‘ज्यांचे त्यांचे विचार असतात. खरंतर ज्यांना मी आवडते ते नक्की माझ्या गोष्टी स्वीकारतात. माझं असं असतं की, जे आहे ते आहे. बरेच लोकं आहेत, ज्यांना मी पटतं नाही. पण ज्यांचे त्यांचे विचार.’

ठसकेबाज लावणी करणाऱ्या गौतमी पाटीलवर कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी टीका केली होती. अजित पवार यांनीही गौतमी पाटीलला एका सभेत खडसावले होते. पण तिने या दोघांनाही प्रत्युत्तर दिले नाही. आपली बोलण्यातील शालीनता जपली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी