28 C
Mumbai
Tuesday, November 28, 2023
घरक्रिकेटआजपासून वनडे क्रिकेट विश्वचषकाला आरंभ

आजपासून वनडे क्रिकेट विश्वचषकाला आरंभ

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहते वनडे विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत होती. तोच दिवस आज पहायला मिळाला मिळणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाचा पहिलाच सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. दोन्हीही संघाचे खेळाडू सज्ज झाले असून सराव करताना त्यांनी घाम गाळला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर ठीक दुपारी 2 वाजताच्या दरम्यान सुरु होईल. त्याचप्रमाणे ठीक 1 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होण्यापूर्वी खेळपट्टीची पाहणी केली जाईल. 2023 या वर्षातील विश्वचषकातील हा पहिला सामना असल्याने सर्वांच्या नजरा रोखल्या आहेत. यामुळे या सामन्यात नेमकं कोण कोणावर भारी पडेल हे पाहणं उत्कंठावर्धक असेल.

कोण कोणावर भारी ?

इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तुल्यबळ संघ म्हणून यांची ओळख आहे. या दोन्ही संघांचा जर विचार केला तर अगदी बरोबरीने या दोन्ही संघाने एकमेकांना टक्कर दिली होती. या संघाच्या आतापर्यंत झालेल्या एकदिवसीय सामन्याचा अभ्यास केल्यास दोन्ही संघ आपापल्या ठिकाणी उत्तम कामगिरी करताना पहायला मिळत आहेत. या दोन्ही संघाचे आत्तापर्यंत एकूण 95 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यातील 45 सामने हे इंग्लंडने जिंकले आहेत. तर त्यातील 44 सामने हे न्यूझीलंडने मात केली. त्यातील 2 सामने बरोबरीने सुटले आहेत. यामुळे आजच्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारेल? हे पाहणे गरजेचे असेल.

असा आहे इंग्लंडचा संघ

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस एटकिन्सन, जॉनी बेअरेस्टो, सॅम कुरन, लियाम, डेव्हिड मिलन, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस वॉक्स.

हे ही वाचा

यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पुन्हा दिसणार सचिन तेंडुलकर, आयसीसीची मोठी घोषणा…

Cricket World Cup 2023 थरार रंगणार; टीम इंडियासह इतर देशांच्या संघांची गेल्या चार वर्षांतील कामगिरी कशी होती ?

वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज, वनडे सह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल

हा संघ घेऊन न्यूझीलंड उतरणार मैदानात 

केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी