32 C
Mumbai
Wednesday, November 15, 2023
घरमहाराष्ट्ररत्नागिरीत मूर्ती व्यवसायाला कोटींची भरारी

रत्नागिरीत मूर्ती व्यवसायाला कोटींची भरारी

राज्यात गणेशोत्सव मोठ्या धूमधडक्यात साजरा केला गेला. कोकणात मानाचा उत्सव म्हणून गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी कोकणात रत्नागिरी येथे गणेशोत्सवात २० ते २५ कोटींची उलाढाल झाली. कोरोनानंतर पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात बाजारपेठातील विक्रीतून एवढी मोठी उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यानी दिली. केवळ मूर्ती विक्रीतून अठरा कोटींची कोटीपर्यंत उलाढाल झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोकणात गणपती उत्सवाला फार महत्व दिले जाते. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी कोकणच्या गावी येतात. प्रत्येक गावामध्ये कुठे घुंगरांचा आवाज तर कुठे तबल्याची साद ऐकू येतो.मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणाहून चाकरमानी मोठया संख्येने कोकणात येतात. सर्वात जास्त घरगुती गणपती हे कोकणामधील रत्नागिरी जिल्हयामध्ये दिसून येतात. कोकणात अनेक ठिकाणी गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी गणरायाची मूर्ती घरी आणण्याची प्रथा आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात मूर्तीशाळेतून गणरायाला आपल्या डोक्यावरून आणले जाते. पाट डोक्यावर ठेवून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली जाते. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाला घरी आणले जाते.

यंदा रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ लाख ६७ हजार ८४४ घरगुती गणपती तर १०९ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना झाली आहे . घरगुती गणपतीमध्ये अंदाजे ११ हजार ९८४ दीड दिवसांचे गणपती,गौरी गणपतीपर्यंत अंदाजे १ लाख ३४ हजार १०३ घरगुती गणपती तर अनंत चतुर्दशीपर्यंत अंदाजे २१ हजार ७५७ घरगुती व १०९ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले.

हे ही वाचा 

नवरात्रीच्या घागरा चोळीची खरेदी करायचीये? ही आहेत मुंबईतील ७ प्रसिद्ध ठिकाणे

अमेरिकेतील मेरिलँडमध्ये उभारला जातोय बाबासाहेबांचा ‘इतका’ उंच पुतळा, लवकरच होणार अनावरण…

म्हणून २ ऑक्टोबर पासून भारतात स्वच्छ भारत मिशन सुरु झाला…

मखराचे साहित्य, गणपतीसाठी लागणारे विविध सामान यात तब्बल दोन आकडी कोटींच्या घरात व्यवहार झाला आहे. यंदा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकारने टोलमाफीची सवलत दिली. त्यामुळे लाखो गणेशभक्त रस्ते मार्गाने कोकणात पोहोचले. यातून स्थानिक पर्यटनालाही मदत मिळाल्याचे उपहारगृहाचे मालक सांगतात. रस्ते महार्गांवर पेट्रोल भरणे, नजीकच्या उपहारगृहात नाश्ता, रात्री ब्रेक घेत हॉटेलमध्ये राहण्याची सोय आदिमुळेही एरव्हीपेक्षाही चांगले उत्पन्न मिळाल्याची माहिती उपहारगृह मालकांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी