27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमुंबईनवरात्रीच्या घागरा चोळीची खरेदी करायचीये? ही आहेत मुंबईतील ७ प्रसिद्ध ठिकाणे

नवरात्रीच्या घागरा चोळीची खरेदी करायचीये? ही आहेत मुंबईतील ७ प्रसिद्ध ठिकाणे

अकरा दिवस वाजत गाजत बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता बाजारात नवरात्रीची लगबाग सुरु झाली आहे. आता कोरोनाचे नियम पूर्णपणे शिथिल झाल्याने मुंबईतील दांडिया उत्सव यंदा दणक्यात साजरा होणार आहे. मुंबईत आता गरबा खेळण्यासाठी मोठया प्रमाणावर नृत्य कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. आता गरबा चालींचा सराव सुरू करण्याची वेळ आली आहे! पण या नवरात्रीत नाचण्यासाठी तुम्ही परफेक्ट पोशाख निवडले आहेत का? तुमच्याकडे गरब्याचे कपडे नसल्यास, मुंबईतील या सात बाजारपेठाना भेट द्या, या ठिकाणी तुम्ही तुमच्या सर्व दांडिया-रास रात्रींसाठी पारंपरिक रंगीबेरंगी कपडे मिळू शकतात.

  • मंगलदास मार्केट 

मुंबईतल्या सगळ्या मार्केटमध्ये सर्वात चांगल्या दर्ज्याचा वस्तू आणि कपडे मिळण्याचे हक्काचे ठिकाण ! मंगलदास मार्केट हे मुंबईतील बहुतेक किरकोळ विक्रेत्यांची आवडती जागा आहे. इथे कपड्यापासून विविध नामांकित कंपनीची सौंदर्यप्रसाधने तुम्हांला उपलब्ध होतील. नवरात्रीच्या एक-दोन आठवडे आधी तुम्हाला फॅब्रिक्सच्या बाबतीत लेटेस्ट ट्रेंड इथे पाहायला मिळतील.
ठिकाण : मंगलदास मार्केट, 66 कांतीलाल एम. शर्मा स्ट्रीट, लोहार चाळ, काळबादेवी, मुंबई
वेळ : सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत, रविवारी बहुतेक दुकाने बंद असतात

  • नटराज मार्केट

नटराज मार्केट हे फॅब्रिक मार्केट पॉकेट-फ्रेंडली आहे. या मार्केटमधील दुकानात फॅब्रिकचा दर्जा, त्यावर केलेले काम आणि अगदी मॅचिंग फॅब्रिकच्या बाबतीतही प्रचंड विविधता आढळते. टाय आणि डाईपासून ते जड बांधणीपर्यंत सर्व प्रकारचे कापड उपलब्ध येथे उपलब्ध आहे !
ठिकाण : स्वामी विवेकानंद रोड, विजयकर वाडी इंडस्ट्रियल, विजयकर वाडी, मालाड पश्चिम, मुंबई
वेळ : सकाळी ११ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत, गुरुवारी बंद

  • भुलेश्वर मार्केट

लेहेंगा खरेदीसाठी तुम्ही बजेट-फ्रेंडली पर्याय शोधत असाल, तर भुलेश्वरला भेट देणे योग्य राहील. साध्या लेहेंग्यापासून ते जड लेहेंग्यापर्यंत सर्व काही या ठिकाणी उपलब्ध आहे. पिक्चरमध्ये दाखवलेले ट्रेंडिंग कपडे येथे तातडीने उपलब्ध होतात.
ठिकाण : भुलेश्वर मार्केट, बीएमसी मार्केट, मरीन लाईन्स ईस्ट, पांजरापोळ, भुलेश्वर, मुंबई
वेळ : सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत, सर्व दिवस

  • मनीष मार्केट

मुंबईतील जवळपास सर्वच भागात मिनी-मनीष मार्केट आहे, परंतु चार बंगला येथील डी.एन. नगर मेट्रो स्टेशनच्या खाली असलेले मनीष मार्केटला तुम्ही आवर्जून भेट द्या. त्यांच्याकडे तुमच्या नवरात्रीच्या पोशाखांसाठी फॅब्रिक्स, बॉर्डर, एम्ब्रॉयडरी वर्क फॅब्रिक्स आणि अगदी लटकनची एक वेगळा कपड्याचा प्रकार उपलब्ध आहे.
ठिकाण : मनीष मार्केट, वर्सोवा रोड, मनीष नगर, चार बंगले, अंधेरी पश्चिम, मुंबई
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ७.३०, रविवारी बंद

  • मंगलम मार्केट

जर तुम्ही नवरात्रीसाठी दांडिया-दिवा बनवण्याचा विचार करत असाल, तर मंगलम मार्केट मध्ये तुम्हाला रास्त किंमतीत दांडिया आणि दिवे बनवून मिळतील. इथे आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या दिव्यांची आरासhही पहायला मिळते. पारंपारिक चन्या-चोळ्यांपासून ट्रेंडी घागरा चोळी तुम्हांला इथे खरेदी करता येतील.
ठिकाण : दशरथलाल जोशी रोड, स्टेशनजवळ, एलआयसी कॉलनी, सुरेश कॉलनी, विलेपार्ले पश्चिम, मुंबई
वेळ : सकाळी १० ते रात्री ८, रविवारी बंद

हे ही वाचा 

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात आता ‘एवढी’ कपात…

महाराष्ट्र की ‘महा’दुर्घटनाग्रस्त राज्य? 6 महिन्यांत 6 मोठ्या दुर्घटना

यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पुन्हा दिसणार सचिन तेंडुलकर, आयसीसीची मोठी घोषणा…

  • बोरिवली स्टेशन मार्केट

बोरिवली रेल्वे स्थानकावर पश्चिम दिशेला उतरल्यानंतर तुम्हाला कपडे खरेदीसाठी मोठी गल्ली दिसेल. त्या गल्लीत आकर्षक पोशाखांची किरकोळ दरात विक्री होते . तुम्हाला पुरुषांसाठी कोट्या, केड्या तसेच महिलांसाठी रंगीबेरंगी चन्या-चोल्या सहज मिळतील. हे बहुतेक रेडीमेड असल्याने, तुम्ही खरेदी अगदी शेवटच्या क्षणालाही करू शकता!
ठिकाण : स्वामी विवेकानंद रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई
वेळ : सकाळी १० ते रात्री ८, सर्व दिवस

  • रंगवस्त्र, चारकोप

नवरात्रीच्या पोशाखांच्या बाबतीत हे अनेकांच्या पसंतीस उतरले पाहिजे. रंग वस्त्र नवरात्रीच्या पोशाखांना भाड्याने देते. भाड्याने गरब्याचे कपडे विकत घेणे हे पाकिटासाठी आणि पर्यावरणासाठीही उत्तम आहे, मग यावर्षी तसे का करू नये!
ठिकाण : रंग वस्त्र, ६४/९०, श्रीजी कृपा बंगला, सेंट मेरी हायस्कूल समोर, सेक्टर २, चारकोप गाव, मुंबई
केव्हा: सकाळी ९ ते संध्याकाळी ६, सर्व दिवस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी