31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रिकेटराहुल-विराटने झोडपले, जडेजाने गुंडाळले, टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

राहुल-विराटने झोडपले, जडेजाने गुंडाळले, टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

वर्ल्डकप 2023 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात टीम इंडियाने रविवारी विजयी सलामी दिली. केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त खेळीने भारताचा विजय सुकर झाला आणि 115 बॉलमध्ये नाबाद 97 धावा करणारा केएल राहुल प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. भारताने 6 विकेटने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. चेन्नईमध्ये रंगलेला सामना क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील असाच होता. ऑस्ट्रेलियाचे 199 धावांचे आव्हान रोहित शर्माच्या टीम इंडियाने अवघ्या 41.2 षटकांमध्ये पूर्ण केले. केएल राहुलने विजयी षटकार मारून टीम इंडियाच्या विजयावर मोहोर उमटवली. पण भारताचा डाव सावरणाऱ्या राहुलाला शतक पूर्ण करता आले ऩाही, याची खंत सर्व भारतीयांना लागून राहिली.

आयसीसी वर्ल्डकप 2023 मधील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. त्यामुळे लढत चुरशीची होणार यात शंका नव्हती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघाने सर्व विकेट गमावून 199 धावा केल्या. यात जडेजाने मोलाची कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू बाद करण्याच्या त्याच्या कामगिरीने ऑस्ट्रेलिया संघाला अपेक्षित धावा करता आल्या नाहीत. शिवाय कुलदीपने दोन आणि आश्विनने एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला आणखी धक्के दिले. त्यामुळे टीम इंडियाला 50 षटकांमध्ये 200 धावांचे आव्हान होते. म्हणजे सरासरी फक्त चार धावांचे हे आव्हान होते.


पण टीम इंडियाची सुरुवात अतिशय वाईट झाली. पहिल्या दोन षटकांमध्ये भारताच्या धावा होत्या तीन आणि इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तीन मोहरे टीम इंडियाने गमावले. तिघेही भोपळाही फोडू न शकल्याने पुढे पराभवाचे चित्र भारतीयांना दिसत होते. हेजलवूडने रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरची विकेट घेऊन तर स्टार्कने इशानची बाद करून टीम इंडियाला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला.

मात्र, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी नेटाने बाजू सावरली आणि दोघांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल 165 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अचानक हेजलवूडला विराटचा बळी घेण्यात यश आले. विराटने 116 बॉलमध्ये तडाखेबंद खेळी करत 85 धावा काढल्या. दोघांनी विजयाचे पारडे भारताच्या बाजूने फिरवले होते. त्यामुळे टीम इंडिया ऩिश्चित होती. विराट बाद झाल्यानंतर मैदानात हार्दिक पंड्या आला. आणि विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला. आणि राहुलने विजयी षटकार लगावून भारताला विजय मिळवून दिला.


केएल राहुल आणि विराट कोहली यांची संयमी आणि आत्मविश्वासपूर्वक खेळी भारताच्या विजयीसाठी खूप महत्त्वाची ठरली. ऑस्ट्रेलियन संघाच्या क़डक क्षेत्ररक्षणाची तटबंदी फोडणे खूप अवघड होते. तरीही राहुल-विराटने जबरदस्त खेळी करत भारताला विजयाकडे आणले.

हे ही वाचा 

दक्षिण आफ्रिकेचा 102 धावांनी दणदणीत विजय; या तीन फलंदाजांची शतकी खेळी

क्रिकेट विश्व चषक स्पर्धेतील वेगवान शतक, ‘या’ खेळाडूने केली किमया !

वर्ल्ड कप 2023 अपडेट्स: जाणून घ्या क्रिकेटच्या ताज्या अपडेट्स!

षटकांनुसार टीम इंडियाचा खेळ

षटके – धावा – विकेट
05 – 03 –   03
10 – 27 –   03
15 – 49 –   03
20 – 80 –   03
25 – 97 –   03
30 – 120 – 03
35 – 151 –  03
40 – 182 –  04
41.2 – 201 – 04

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी