33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्राईमतळेगाव दाभाडेमध्ये भर दूपारी गोळ्या घालून, कोयत्याने वार करुन सामाजिक कार्यकर्त्याची हत्या

तळेगाव दाभाडेमध्ये भर दूपारी गोळ्या घालून, कोयत्याने वार करुन सामाजिक कार्यकर्त्याची हत्या

पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर भर दूपारी सामाजिक कार्यकर्त्यावर गोळ्या झाडून, कोयत्याने वार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. किशोर आवारे असे हल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष होते. जनसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करत होते.

किशोर आवारे मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नगर परिषदेच्या कार्यालयात आले होते. मुख्याधिकाऱ्यांना भेटल्यानंतर ते बाहेर पडताना नगर परिषदेच्या परिसरात दबा धरुन बसलेल्या चौघांनी आवारेंवर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांपैकी दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तर दोघांनी कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आवारेंना पाहत हल्लेखोर काही काळ तेथे थांबले आणि नंतर पसार झाले. त्यानंतर आवारेंना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजकीय वादातून आवारे यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र हल्लेखोर सापडल्यानंतरच खरे कारण समजू शकते.

किशोर आवारे हे सामाजिक कार्यामुळे नावारुपाला आले होते. सामाजिक कार्यामुळे त्यांचा लोकसंपर्क वाढला होता. त्यांनी राजकारणात देखील सक्रीय सहभाग घेत तेथे राजकीय कार्य सुरु केले होते. नगर परिषदेच्या निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक त्यांनी निवडून आणले होते. पुण्याबाहेर देखील त्यांनी सामाजिक कार्य सुरु केले होते. कोकणात चिपळूनमध्ये त्यांनी अतिवृष्टीमुळे महापूर आला तेव्हा सामाजिक हेतूने मदत कार्य केले होते. कोरोना काळात देखील त्यांनी जनसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून मदतकार्य केले होते.

हे सुद्धा वाचा 

अनिल देशमुखांना अडणीत आणणारे परमविर सिंग पुन्हा पोलीस दलात येणार

धक्कादायक: नशा करणाऱ्या बॉडीबिल्डरने जन्मदात्यांवरच केले चाकूने वार

छंद डिग्र्यांचा: डॉक्टरेटनंतर 77 टक्क्यांनी उत्तीर्ण होत मुख्यमंत्र्यांनी मिळवली ‘ही’ पदवी

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून आवारे यांनी तळेगावात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क बनवला होता. सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून किशोर आवारे यांनी राजकारणात आपले स्थान बळकट केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी