28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनचिन्मय मांडलेकरांनी मुलाला देशभक्ताचं नाव दिलं, पण अंधभक्तांचं पित्त खवळलं

चिन्मय मांडलेकरांनी मुलाला देशभक्ताचं नाव दिलं, पण अंधभक्तांचं पित्त खवळलं

चिन्मय मांडलेकर हा मराठीमधील एक चांगला अभिनेता आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे तो घराघरांत पोचलाय. पण सध्या तो चांगलाच अडचणीत सापडलाय. धर्माच्या ठेकेदारांनी मांडलेकर, त्याची पत्नी व त्याच्या मुलाच्या नावानं सोशल मीडियावर गरळ ओकायला सुरूवात केलीय

चिन्मय मांडलेकर हा मराठीमधील एक चांगला अभिनेता आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे तो घराघरांत पोचलाय. पण सध्या तो चांगलाच अडचणीत सापडलाय. धर्माच्या ठेकेदारांनी मांडलेकर, त्याची पत्नी व त्याच्या मुलाच्या नावानं सोशल मीडियावर गरळ ओकायला सुरूवात केलीय(Chinamay Mandlekar boy name Jehangir).

मांडलेकर दांपत्याच्या पोटी १३ वर्षांपूर्वी एक अपत्य जन्माला आलं. त्याचं नाव त्यांनी अतिशय विचार करून ठेवलं. जहांगीर असं त्या मुलाचं नाव आहे. चिन्मय मांडलेकर यानं त्याच्या एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. जहांगीर हे नाव हिंदू धर्मातील नाही, ते मुस्लीम धर्मातील आहे, असा समज करून धर्माच्या ठेकेदारांनी मांडलेकर दांपत्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यांच्यावर चौफेर बाजूनं टीका केली जातेय. हा देश जणू आपल्या बापाच्या मालकीचा आहे. आणि त्याचा सातबारा आता आपल्याच नावावर झालाय, असा माजुरडेपणा काही तथाकथित हिंदूत्ववाद्यांनी दाखवून दिलाय. या माजुरड्यांनी मांडलेकर दांपत्याला तुम्ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात राहायला जा, असा फतवा काढलाय.

दळिद्री बुद्धी असलेल्या या अंधभक्ताच्या असल्या घाणेरड्या आणि गलिच्छ आदेशानंतर मांडलेकर कुटुंबिय दुखावले गेले आहेत. विशेषतः चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नी नेहा मांडलेकर यांनी एक व्हिडीओ जारी केलाय. तो ऐकल्यानंतर कुणाच्याही काळजात चर्र होईल. हिंदू धर्मामध्ये रावणाच्या अवतारातील काही भक्तगण तयार झाले आहेत. सितेसारख्या नेहा मांडलेकर यांची निंदानालस्ती करताहेत. रामाची मुलं लव व कुश यांनाही त्रास दिला गेला होता. तसा त्रास या १३ वर्षाच्या मुलालाही दिला जातोय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी