35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeक्राईमनाशिकच्या सिन्नर फाटा भागात ५०० किलो गोमांस जप्त

नाशिकच्या सिन्नर फाटा भागात ५०० किलो गोमांस जप्त

गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले मांस वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या नाशिक रोड पोलिसांनी मुस्क्या आवळल्या असून त्याच्याकडून तब्बल 500 किलो गोमांस व वाहनांसह चार लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोमांस वाहतूकीवर कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सूचना गुन्हे शोध पथकास दिल्या होत्या. वरिष्ठांच्या सूचनेनुसार नाशिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके व अंमलदार यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदा गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले होते.

यानुसार 11 फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार संदीप पवार, पोलीस कॉन्स्टेबल मनोहर कोळी यांना गुप्त बातमीदारांमार्फत नाशिक महामार्गावर सिन्नर कडून एक ग्रे रंगाची इको गाडी गोमांस वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून गोमांस वाहतूक करणाऱ्या ईको गाडीला शिताफीने पकडले. यावेळी इको वाहन चालक राजीक मुनीर शाह या ताब्यात घेण्यात आले. तो संगमनेर येथील रहिवासी असून त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एक लाख रुपये किमतीचे जनावरांचे कातडी नसलेले मास त्यात मुंडके व तुकडे केलेले अवयव त्यांचे अंदाजे वजन 500 किलोग्राम, तीन लाख 50 हजार रुपये किमतीची एक मारुती सुझुकी कंपनीची ईको गाडी (एम एच 46 बी इ 3895) नंबर असलेली गाडी जप्त करण्यात आली. असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी करत आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत , यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके, पवन चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांसह गुन्हे शोध पथकाने केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी