28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeआरोग्यनाशिकमध्ये खासगी हॉस्पिटल बिलावर आता मनपाचा वॉच

नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटल बिलावर आता मनपाचा वॉच

शहरातील खासगी रुग्णालयाच्या प्रथमदर्शनी भागात दरपत्रक लावन्याचे निर्देश असून त्याकडे कानाडोळा करणाऱ्या रुग्णालयाकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दूर्लक्ष झाल्याचे चित्र होते. दरम्यान याप्रकरणी पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली असून त्यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पत्र काढत प्रथमदर्शनी दरपत्रक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर रुग्णांकरिता टोल फ्री क्रमकांची व्यवस्था सुरु असेल.महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियम सुधारित 2021 नुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णालयाचे दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक आहेत. शहरातील 90 टक्के रुग्णालयांत या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप केला जात होता. मध्यंतरी महापालिकेने शहरातील 580 खासगी रुग्णालयांना याबाबतची सूचनापत्रे पाठवून दरपत्रक लावण्यास सांगितले होते.

शहरातील खासगी रुग्णालयाच्या प्रथमदर्शनी भागात दरपत्रक लावन्याचे निर्देश असून त्याकडे कानाडोळा करणाऱ्या रुग्णालयाकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दूर्लक्ष झाल्याचे चित्र होते. दरम्यान याप्रकरणी पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली असून त्यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पत्र काढत प्रथमदर्शनी दरपत्रक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर रुग्णांकरिता टोल फ्री क्रमकांची व्यवस्था सुरु असेल.महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियम सुधारित 2021 नुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णालयाचे दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक आहेत. शहरातील 90 टक्के रुग्णालयांत या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप केला जात होता. मध्यंतरी महापालिकेने शहरातील 580 खासगी रुग्णालयांना याबाबतची सूचनापत्रे पाठवून दरपत्रक लावण्यास सांगितले होते.परंतु, या रुग्णालयांकडून या सूचनापत्रांना केराची टोपली दाखवली गेली. त्यानंतरे वैद्यकीय विभागाने नावाला नोटीसांचे अस्र वापरत 49 रुग्णालयांना दरपत्रक लावण्यासंदर्भात नोटीसा धाडल्या होत्या. परंतु हा त्यावेळी केवळ फार्स च ठरला. पुढे मनपाच्या वैद्यकिय विभागालाही याचा विसर पडला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने रुग्णांवरील उपचाराबाबतचे दर निश्चित करीत तसे परिपत्रक काढले होते. यानुसार रुग्णालयाच्या दर्शनी भागात बेडनिहाय उपचाराचे दर लावण्याचे बंधनकारक केले. करोना काळात याची यशस्वी अंमलबजावणी झाली. मात्र करोना संपताच रुग्णालयातील दरपत्रक गायब झाले. राज्याच्या आरोग्य विभागाने 2021 मध्ये महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमात सुधारणा करीत खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णालयाचे दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक केले होते. मात्र खाजगी रुग्णालयात त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी जन आरोग्य समितीकडून करण्यात येत होत्या.

केवळ फार्स नको कारवाई हवी

महापालिकेच्या आरोग्य विभागाला दरपत्रक लावण्यासंदर्भात उशीरा ना का होइना जाग आल्याने दरपत्रक आता तरी प्रथमदर्शनी भागात लागावे.
तसेच जो टोल फ्री क्रमांक आहे, तो देखील प्रथमदर्शनी असावा. बहुतेक ठिकाणी हा क्रमांका नागरिकांना माहितीच नाही. त्यामुळे मनपाने केवळ औपचारिकता पूर्ण न करता नियम मोडणाऱ्यांवर कारवाइ करावी.
-गौतम सोनवणे, समन्वयक, जन आरोग्य समिती, नाशिक

तर परवाना रद्द्द

रुग्णालयांनी प्रथमदर्शनी भागातच दरपत्रक लावावे. यासंदर्भात आम्ही शहरातील सर्व रुग्णालयांना पत्र पाठवत आहोत. केलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द्द करण्यात येइल.
-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकिय अधिकारी, मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी