31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्राईमविभागीय माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

सहाय्यक संचालकाची बनावट साक्षरी करून वाहनचालकाने परस्पर दहा लाखाचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी विभागीय माहिती कार्यालयातील कागदपत्रांचा वापर करून सहाय्यक संचालकांची खोटी स्वाक्षरी करून बँकेची व कार्यालयाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी कर्मचारी वाहनचालकां विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मोहिनी श्रीकृष्ण राणे (३७) या बी. डी. भालेकर मैदान येथे असलेल्या विभागीय माहिती कार्यालयात सहाय्यक संचालक म्हणून काम पाहतात. या कार्यालयात संशयित आरोपी राजू अण्णा चौघुले हा वाहनचालक म्हणून काम करतो.

दरम्यान, राजू चौघुले याने मंत्रालय को- ऑपरेटिव्ह बँकेच्या नाशिक शाखेकडे दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याकरिता फिर्यादी मोहिनी राणे यांच्या विभागीय माहिती कार्यालयाकडील लेटरहेड, गोल शिक्का व पदनामाचा स्टॅम्प वापरून पदनामाच्या स्टॅम्पवर फिर्यादी राणे यांची मिळतीजुळती खोटी स्वाक्षरी केली. त्यानंतर ही कागदपत्रे बँकेत सादर केली. दरम्यान, विभागीय माहिती कार्यालय व संबंधित बँकेची दिशाभूल व कागदपत्रे सादर करून आरोपी राजू चौघुले याने फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विभागीय माहिती कार्यालय येथे घडला

उपसंचालक ज्ञानोबा इगवे यांनी या कर्ज प्रकरणाबाबत खात्री केली असता हा प्रकार समोर आला. राणे यांनी अशा कुठल्याही प्रकारचे पत्र दिले नसून त्यावरील सही बनावट असल्याचे म्हटले आहे. राणे यांनी याबाबत वरिष्ठांना याबाबत अहवाल सादर केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित वाहन चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि शिंदे करीत आहे.

या प्रकरणातील संशयित राजू आण्णा चौघुले याने यापूर्वी पंचवटी परिसरातील गोराराम मंदिराचे महंत राजारामदास गुरु श्री शालीग्रामदास वैष्णव, ४३, रा, गोरेराम मंदिर, सीतागुंफा रोड, पंचवटी यांच्याकडून संशयित राजू अण्णा चौघुले, रोहन राजू चौघुले दोघे रा. चौघुले निवास, अशोक नगर, सातपूर आणि भारती युवराज शर्मा, रा. समीर अपार्टमेंट, स्वामी नारायण मंदिराजवळ, नाशिक यांनी महंत राजारामदास महाराज यांचा ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा बहाणा करत विश्वास संपादन करून एकूण ४० लाख रुपये घेत फसवणूक केली आहे. संशयित चौघुले आणि भारती शर्मा यांनी नाशिकच्या न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आत्ता नाशिक पोलीस या संशयिताला कधी अटक करणार आणि याचे अजून किती कारनामे उघड होणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी