28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्राईमशौचाला बसला दगड मारला आणि जीव गेला

शौचाला बसला दगड मारला आणि जीव गेला

पंचवटी परिसरात रविवारी सकाळी खुनाची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरू असून रविवारी सकाळी मालेगाव स्टँड पोलीस चौकी समोर असलेल्या अहिल्यादेवी होळकर पुलकडून गोदाघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात दोघा संशयितांनी एका फिरस्त्या माणसाला मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवार दि. १० रोजी सकाळी या घटनेची उकल झाली. मालेगाव स्टॅन्ड पोलीस चौकीसमोर असलेल्या अहिल्यादेवी होळकर पुलाकडून खाली गोदाघाट परिसराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एका अज्ञात पुरुषाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची माहिती पंचवटी पोलिसांना काही सजग नागरिकांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (प्रशासन) नंदन बगाडे, सहायक पोलीस निरीक्षक रायकर, उपनिरीक्षक कैलास जाधव, योगेश माळी, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, राहुल लभडे, अशोक काकड, उत्तम पवार, राजेश सोळसे, अभिजित पैठणकर, महेश नांदूर्डीकर, दीपक नाईक, विष्णू जाधव, विलास माळोदे, संदीप मालसाने, श्रीकांत कर्पे, एस यु अहिरे, कैलास वाघचौरे, निलेश भोईर, महाले, परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घाव घेत फिंगर प्रिंट शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच, श्वान पथकाने देखील मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता श्वानाने रामकुंडापर्यंत मारेकऱ्यांचा माग दाखवला. या खुनाच्या घटनेचा सर्व थरार परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या मध्ये अज्ञात दोघे जण मयताला मारताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून मारेकऱ्यांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दोन पथके रवाना केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड, उपनगर, सिडको, देवळाली कँम्प, पंचवटी या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खुनाच्या घटना सुरु आहे. त्यात अजून पंचवटी परिसरामध्ये घडलेल्या खुनाच्या घटनेची भर पडली असल्याने शहरात सुरु असलेल्या हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या खुनाच्या सत्रामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे गुन्हेगार देखील पोलिसांचा कुठलाच अंकुश नसल्याने रस्त्यावर हॅप्पी क्राईम करताना दिसत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मवाळ भूमिकेमुळे शहरातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात हाणामाऱ्या, जबरी लूट, खून, प्राणघातक हल्ले, अपहरण, घरफोडी, चैन स्नॅचिंग, दुचाकी-चारचाकी चोरी, सायलेन्सर चोरी, मोबाईल चोरी या गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांचा कुठलाही वचक सराईत गुन्हेगारांवर दिसत नसल्याने अनेक तडीपार गुन्हेगार सध्या शहरात वास्तव्य करून आपल्या गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे दिसून येत आहे. याविरोधात पोलीस आयुक्त कर्णिक यांनी कडक पाऊले उचलून शहर गुन्हेगारांपासून भयमुक्त करण्याची गरज असल्याची मागणी नाशिककरांकडून करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी