33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे गुणवंत महिलांचा सत्कार

नाशिक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे गुणवंत महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला .सिडको येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार अधिकारी अश्विनी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून वासन टोयाटाच्या मॅनेजर प्रीती नेरकर उपस्थित होत्या. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नलिनी निवृत्ती जाधव, ज्योती जोशी, भावना रवींद्र गांगुर्डे (महावितरण ), सुरेखा गायकवाड (व्हीआयपी इंडस्ट्रीज) या गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व पाहुन्यांचे स्वागत भावना बच्छाव यांनी केले.

प्रीती नेरकर यांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. अश्विनी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महिला कल्याण सहाय्यक सौ.वंदना पवार यांनी स्वागत केले.केंद्र संचालक मंजुळा परदेशी यांनी आभार मानले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी