नाशिक शहरात महापालिकेकडून पुणे महामार्गावरील रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या डेरेडार वृक्षांवर (Tree ) कुन्हाड चालविली असताना दुसरीकडे शल याचा फायदा घेत काही वृक्ष बटा तस्करांकडून शहरातील अन्य भागातील वृक्षांवर ही कुन्हाड फिरविली जात आहे. अवैधरीत्या वृक्षतोड (Tree felling) करणाऱ्यांचा रात्रीस खेळ चालतो. मध्यरात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नर परिसरातील विलायती चिंचेचे झाड कापून टाकण्यात आल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरातील मध्यवर्ती परिसर म्हणून इन ओळखल्या जाणान्या कॅनडा कॉर्नर येथील एका व्यावसायिक संकुल जवळ की असलेले डेरेडार चिंचेचे झाड मध्यरात्री ची अज्ञात इसमांनी कापल्याचा त धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १५) चे सकाळी उघडकीस आला.(A tree was cut in the middle of the night at Nashik Canada Corner)
येथील झाड तोडण्यासाठी दोन दिवसांपूर्वी काही लोक आले होते. त्यावेळी परिसरातील २ जागरूक पर्यावरणप्रेमी रहिवाशांनी त्यांना विरोध केला. महापालिकेची परवानगी आहे का? असे विचारले • असता त्यांनी नकार देत येथून काढता पाय घेतला; मात्र रविवारी मध्यरात्रीच्या – सुमारास अज्ञात लोकांनी याठिकाणी येऊन झाडावर घाव घातला. हिरवेगार झाड तोडल्याने उद्यान विभागाने पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कॅनडा कॉर्नर- शरणपूर रस्त्यावरील संकुलाजवळ तोडलेले हिरवेगार झाड. बेकायदा वृक्षतोड कोण थांबविणार..?
■ शहरात बेकायदेशीर वृक्षतोड थांबविण्यास महापालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाला अपयश येत असल्याचे बोलले जात आहे. महापालिका हद्दीतील झाडांचे संरक्षण व जतन करण्याची जबाबदारी महापालिका उद्यान विभागाची असताना या झाडांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
■ मनपाने याप्रकरणी गांभीयनि लक्ष घालून कॅनडा कॉर्नर येथील झाडाची विना परवानगी तोड करणाऱ्याऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
बांधकाम व्यावसायिक लड्डा यांच्याकडून काही दिवसांपूर्वी आड तोडण्याच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. त्यांना परवानगी नाकारून केवळ धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यास सांगितले होते. मात्र हे झाड संपुर्णपणे तोडण्यात आल्याचे सोमवारी लक्षात आले. यामुळे त्यांनीच झाड कापले असावे, असा दाट संशय आहे. यामुळे त्यांना नोटिस बजावण्यात येणार आहे. त्यांच्याविरोधात उद्यान विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनास्थळी उद्यान विभागाच्या पथकाने जाऊन पाहणी करून पंचनामाही पुर्ण केला आहे. विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, मनपा