29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमनाशिक पंचवटी परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाचे अपहरण करून हत्या केली

नाशिक पंचवटी परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाचे अपहरण करून हत्या केली

पंचवटी परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाचे पाच संशयितांनी अपहरण करत त्याची मोखाडा परिसरात हत्या केली होती. तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोखाडा परिसरातील जंगलात निर्जनस्थळी मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील फरार असलेल्या तीन संशयितांपैकी एका संशयिताला सैय्यद पिंप्री येथून अटक करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले असून, फरार असलेल्या दोघा संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहे. सराईत गुन्हेगार संदेश सूर्यकांत काजळे, ३५, रा. सिताराम चेंबर्स, पेठाफाटा, पंचवटी, नाशिक याचे आर्थिक वादातून शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास संशयित नितीन उर्फ पप्पू कचरू चौघुले, रणजित संजय आहेर, स्वप्नील दिनेश उन्हवणे, पवन संजय भालेराव आणि करण अनिल डेंगळे यांनी निमाणी बस स्टॅन्ड समोरील इमारतीच्या पार्किंगमधून अपहरण केले होते.

तसेच, चारचाकी वाहनातून अपहरण करून संदेश याची गाडीतच हत्या करण्यात आली होती. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने या पाच संशयितांनी संदेशाचा मृतदेह थेट त्रंबककेश्वरच्या पुढे असलेल्या मोखाडा येथील वाघ नदीच्या परिसरातील जंगलात निर्जनस्थळीजाळून टाकला होता. याबाबत संदेशचा चुलत भाऊ प्रितेश विलास काजळे याने पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पंचवटी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित स्वप्नील उन्हवणे आणि पवन भालेराव यांना शिताफीने अटक केली होती. तर संशयित रणजित आहेर, नितीन चौघुले आणि करण डेंगळे हे फरार झाले होते. हत्येच्या घटनेला जवळपास महिना होत आला तरी इतर संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. यातच संशयित नितीन उर्फ पप्पू कचरू चौघुले हा सैय्यद पिंप्री येथे लपून बसला असल्याची गुप्त माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सैय्यद पिंप्री येथे सापळा रचला असता संशयित नितीन चौघुले पोलिसांच्या हाती लागला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. तसेच फरार दोघा संशयितांना देखील लवकरात लवकर अटक करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी