28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाने सिंहस्थ कामासाठी नेमणार सल्लागार

नाशिक मनपाने सिंहस्थ कामासाठी नेमणार सल्लागार

महापालिकेत प्रशासकीय राजवटीत अधिकार्‍यांवर कोणाचाही लगाम नसल्याने सल्लागार नेमण्याचा सपाटा सुरु आहे. नाशकात सन सिंहस्थ-२०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा असून सर्व कार्यकारी विभागांचे विविध कामांचे सर्वेक्षण करणेसाठी सल्लागार सर्वेक्षक नेमण्यास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी सल्लागारास लाखो रुपयांचे शुल्क देण्याची तयारी मनपाने केली आहे.नाशिक त्र्यंबकेश्वर सन २०२७-२८ यावर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. नाशिक येथे होणा-या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिक महानगरपालिकेने तब्बल अकरा हजार कोटींचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. त्यात बांधकाम विभागास मनपा हद्‌दीतील सुमारे ३५० किमी रस्त्याचे विकसन करावे लागणार आहेत.

शिवाय साधुग्राम साठी अंदाजे ३६३ एकर आगा आरक्षित असून सुमारे ७० एकर जागा मनपाचे ताब्यात आहे. उज्जैन, अलाहाबाद, हरिद्वार येथील पूर्व अनुभव लक्षात घेता साधुग्राम साठी अंदाजे सुमारे ७०० एकर जागेचे सर्वेक्षण करून सुमारे ५०० ते ५१० एकर जागेचे तात्पुरते अधिग्रहण करावे लागणार आहे. तांत्रिकदृष्ट्‌या आवश्यक बाबी विचारात घेऊन नाशिक महानगरपालिकेस पुरवाव्या लागणा-या सुविधा विचारात घेऊन साधुग्राम लेआउट तयार करणे, प्लॉट, रस्ते, सर्विस रोड, पाणी पुरवठा, मलकहिका, विद्युत खांब, दवाखाने, पोलीस पोस्ट, इत्यादी गोष्टींचे नकाशावर, जागेवर काम सुरु करण्यापूवी, सुरु असताना व काम झाल्यानंतर डोमार्केशन करणे, जागेवरील झाडे, टॉवर लाईन, घरे, उभी पिके मोजणीची कामे करावी लागणार आहेत.याशिवाय कुंभमेळा संपल्यानंतर सर्वेक्षण नकाशानुसार तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत केलेली जागा पुन्हा डिमार्केशन करून मुळ जागामालाकास हस्तांतरीत करावी लागणार आहे. त्यासाठी मागील सिंहस्थ २०१५-१६ चा अनुभव लक्षात घेता सर्व आधुनिक गोष्टीचा अंतर्भाव करून मनपाच्या सर्व विभागांस आवश्यक सर्वेक्षणाच्या विविध बाबींच्या कामांचे स्पेसिफिकशन निश्चीत करावे लागणार आहेत. या सर्व कामांमध्ये तांत्रिक अचूकता असणे गरजेचे आहे. ते पाहता सल्लागार सर्वेक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी