31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमअशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर 'हजर'!

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांनी शुक्रवारी ( ता २६) उपनगर पोलिसात हजेरी लावली. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी आहे. दरम्यान, दिवंगत मनोहर कारडा यांच्या पत्नी भारती कारडा यांचा उपनगर पोलिसांनी जबाब नोंदवून घेण्यात आला. येत्या काही दिवसात त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यासह संशयितांविरुद्ध नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले, सोळा कोटी रुपयांपर्यंत नागरिकांची फसवणूक झाली आहे.

आयुक्तालयाने ‘लूक आऊट’ नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी ( ता २६) उपनगर पोलिसात हजेरी लावली. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी आहे. दरम्यान, दिवंगत मनोहर कारडा यांच्या पत्नी भारती कारडा यांचा उपनगर पोलिसांनी जबाब नोंदवून घेण्यात आला. येत्या काही दिवसात त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यासह संशयितांविरुद्ध नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले, सोळा कोटी रुपयांपर्यंत नागरिकांची फसवणूक झाली आहे.(Ashok Kataria ‘appears’ before Upnagar police!)

कटारियांविरुद्ध एक गुन्हा नोंद असून, त्यात ९९ लाख रुपयांपर्यंत फसवणूक आहे. गुन्ह्यांच्या तपासात उपायुक्त परिमंडळ दोनच्या पथकासह उपनगर पोलिसांनी कारडा.

कटारिया, पारख यांच्या घरासह कार्यालयात झडती घेत संबंधित बांधकाम प्रकल्पांची आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली आहेत. नोटीस बजावूनही कटारिया, कारडा, पारख आदि संशयित उपनगर पोलिसात हजर होत नसल्याने पोलीस आयुक्तालयाने या संशयिता विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती.
अखेर शुक्रवारी कटारिया उपनगर पोलीस ठाण्यात हजर झाले कटारिया यांच्या अटकपूर्व जामीनावर येत्या सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी आहे. दरम्यान, दिवंगत मनोहर कारडा यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी भारती कारडा यांनी उपनगर पोलिसांना संशयितांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्या संदर्भातील अर्ज दिला आहे.

त्यानंतर पोलिसांनी चौकशी करीत 65 पानांची डायरी ताब्यात घेतली आहे या संदर्भात भारती कारडा यांचा उपनगर पोलिसांनी शुक्रवारी जबाब नोंदवून घेतला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्टी केली असून येत्या काही दिवसात त्यानुसार कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी