31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमपत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची...

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी न छापण्याबाबत धमकी देणार्‍या चार जणांना गजाआड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढवीत आहेत. बोरीवली (प.) बाभई व वजीरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्यामुळे त्यांनी नाकाला रुमाल लावला होता. सदर बातमी नेहा पुरव यांनी आपल्या दैनिकात प्रसिद्ध करताच गोयल यांच्यावर टीका होऊ लागली.

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी न छापण्याबाबत धमकी देणार्‍या चार जणांना गजाआड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढवीत आहेत. बोरीवली (प.) बाभई व वजीरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्यामुळे त्यांनी नाकाला रुमाल लावला होता. सदर बातमी नेहा पुरव यांनी आपल्या दैनिकात प्रसिद्ध करताच गोयल यांच्यावर टीका होऊ लागली.(Arrest those who threatened journalist Neha Purv; Mumbai Marathi Patrakar Sangh demands)

परिणामी, गुरुवारी रात्री १० वाजता काही अज्ञात इसमांनी नेहा पुरव यांच्या घरी जाऊन ‘‘पुन्हा मच्छीची बातमी छापू नका’’ असा धमकीवजा इशारा दिला. प्रामाणिकपणे पत्रकारिता करीत असताना एका महीला पत्रकाराला घरी जाऊन धमकावणे हे धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ या भ्याड कृत्याचा निषेध करीत असून संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करीत आहे.

-नरेंद्र वि. वाबळे
अध्यक्ष
-संदीप चव्हाण
कार्यवाह

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी