फुलेनगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराची हत्या < Murder >अल्पवयीन संशयितांनी केल्याची घटना घडली आहे. तर वाहन पार्किंगच्या वादातून एकाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून हल्ला करण्यात आला ऐन होळीच्या दिवशी घडल्याने होळीचा रंग बेरंग झाल्याचे दिसून आले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरु झाल्याने पुन्हा एकदा पंचवटी रक्तरंजित झाल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी रोहित श्रीपत उपाडे, २३, रा. कालिका नगर, मायको हॉस्पिटल मागे, गल्ली नंबर ६, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक याने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार संशयित विश्वास बाबर याचे निलेश श्रीपत उपाडे, २१, कालिका नगर, पंचवटी यांच्यासोबत मागील भांडणाच्या कुरापतीवरून बाचाबाची झाली होती.(Nashik: Man killed in Phulenagar area)
याचाच राग मनात धरून संशयित विश्वास बाबर आणि त्याच्यासोबत असलेल्या पाच अल्पवयीन संशयितांनी रविवार दि. २४ रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास म्हाडा बिल्डिंगच्या मागे, सुलभ शौचालया जवळ, फुलेनगर, पंचवटी येथे निलेश उपाडे हा उमेश साबळे या मित्रासोबत गप्पा मारत असताना त्याला गाठून धारदार शस्त्रांनी मानेवर, पोटावर, पाठीवर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच, तात्काळ परिसरात शोध मोहीम राबवून दोघा अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर फरार झालेल्या संशयितांच्या मागावर पोलीस पथके रवाना केली आहे.
रविवार दि. २४ रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास म्हाडा बिल्डिंगच्या मागे, सुलभ शौचालया जवळ, फुलेनगर, पंचवटी येथे निलेश उपाडे हा उमेश साबळे या मित्रासोबत गप्पा मारत असताना त्याला गाठून धारदार शस्त्रांनी मानेवर, पोटावर, पाठीवर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच, तात्काळ परिसरात शोध मोहीम राबवून दोघा अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर फरार झालेल्या संशयितांच्या मागावर पोलीस पथके रवाना केली आहे.
याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनिरीक्षक के.एस. जाधव करत आहे. या खुनाच्या घटनेनेनंतर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी आंचवती पोलीस ठाण्यात येऊन संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देत फरार संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहे.