26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeक्राईमगँगस्टरच्या मुलाला सायबर गुन्हेगारांनी लुटलं

गँगस्टरच्या मुलाला सायबर गुन्हेगारांनी लुटलं

गँगस्टरच्या मुलाला सायबर गुन्हेगारांनी लुटलं.
Gangster’s son robbed by cybercriminals

सायबर गुन्हेगारांनी एका गँगस्टरच्या मुलाला 6 लाख रुपयांना लुटलं आहे.ऑन लाईन फ्रॉडच्या माध्यमातून ही फसवणूक केली आहे. मयत गँगस्टर सुरेश मंचेकर याचा मुलगा विनायक मंचेकर यांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश मंचेकर हा मोठा गँगस्टर होता.त्याची प्रचंड दहशत होती.विनायक मंचेकर हा सुरेश मंचेकर याचा मुलगा आहे.विनायक हा एमएससी करतोय.फावल्या वेळेत काही तरी नोकरी करावी, असा विचार करून तो पार्ट टाइम नोकरी शोधत होता.अनेक ऍप वर त्याने नोकरी शोधली.आपला बायोडाटा पाठवला.

हे सुरू असताना त्याला एका महिलेचा कॉल आला.या महिलेचं नाव निशा होत.तिने विनायक याला अनेक इन्व्हेस्टमेंट प्लान बद्दल सांगितलं. त्याच प्रमाणे त्या बदल्यात चांगला नफा होत आहे.आपण ही इन्व्हेस्टमेंट करा आणि चांगलें पैसे कमवा, अस तिने सांगितलं.त्या महिलेने एक लिंक पाठवली आणि ती ओपन करा,सांगितलं. विनायक यांनी ती लिंक ओपन केली आणि घात झाला. विनायक यांच्या खात्यातून पाच लाख 93 हजार रुपये गेले.हा प्रकार पाहून विनायक चक्रावले. त्यांनी तात्काळ मुलुंड पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली. याबाबत मुलुंड पोलीस स्टेशन येथे फसवणूक ,फोर्जरी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि त्या महिलेचा शोध सुरू केला आहे.

गँगस्टर सुरेश मंचेकर बाबत

मंचेकर याने शाळेत असतानाच शि क्षण सोडलं. यानंतर नागपाडा , भायखळा , काळा चौकी या भागात तो छोटे मोठे गुन्हे करत होता.तो 1982 साली गुन्हेगारी जगतात आला.सुरुवातीला तो गँगस्टर गुरू साटम सोबत काम करायचा. मात्र, 1994 सालात त्याने स्वतःची गँग बनवली.तो ठाण्यात सक्रिय झाला.ठाणे येथिल बिल्डर आणि व्यापारी यांच्या कडून खंडणी उकळू ला केला.गला.ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण , डोंबिवली या ठिकाणी ही त्याची दहशत होती.

 

हे देखिल वाचा

अभिनेत्री ख्रिसन परेरा हिला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फसवलं

राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर यांची नावे चर्चेत

शिंदेंचे मुख्यमंत्रीपद गेले तरी सरकार बदलणार नाही; छगन भुजबळांचा मोठा दावा

 

त्याने कल्याण येथील डॉ दीपक शेट्टी यांची खंडणी न दिल्याने हत्या केली होती.यानंतर कल्याण शहरात खळबळ माजली होती. मेडिकल फिल्ड मधील लोकांत त्याची दहशत झाली होती.मंचेकर यांच्यावर खून , खुनाचा प्रयत्न आणि खंडणीच्या 40 केसेस होत्या.त्याचा खूपच त्रास वाढल्याने पोलिसांनी त्याच्या गँगचा विरोधात मोहीम उघडली होती.त्याच्या गँगचा 25 जणांना पोलीस निरीक्षक रवींद्र आंग्रे यांनी मारलं होत. यानंतर पोलीस मंचेकर याच्या मागावर होते.पण तो काही सापडत नव्हता.अखेर तो कोल्हापूर येथे येणार असल्याची माहिती आंग्रे यांना मिळाली होती.मग त्यांनी सापळा लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, यावेळी त्यानेच पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तो ठार झाला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी