29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयशिंदेंचे मुख्यमंत्रीपद गेले तरी सरकार बदलणार नाही; छगन भुजबळांचा मोठा दावा

शिंदेंचे मुख्यमंत्रीपद गेले तरी सरकार बदलणार नाही; छगन भुजबळांचा मोठा दावा

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांचा विषय चांगलाच गाजत आहे. जळगाव दौर्‍यावर असलेल्या संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत या सरकारचे डेथ वॉरंट काढल्याचे बोलले होते. त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसांत हे सरकार कोसळणार असल्याचे ते म्हणाले होते. या सगळ्या प्रश्नावर अनेक राजकीय आपली प्रतिक्रिया देत आहेत. याबाबत नाशिकमध्ये बोलतांना भुजबळ म्हणाले, संजय राऊत संपादक आहेत, ते दिल्लीमध्ये काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असेल. राऊत यांचा एक दावा खरा ठरू शकतो तर दुसरा दावा खोटा, अशा आशयाचे वक्तव्य भुजबळांनी केले आहे.

राज्यात मुख्यमंत्री बदलतील अशी काही स्थिती नाही, पण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर हा संपूर्ण खेळ अवलंबून आहे. 16 आमदारांची सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल जाईल. शिंदे साहेब त्यात आहेत. ते मुख्यमंत्रीपदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल. पण जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे. दुसरं म्हणजे, निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेले तरी सरकार हे 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 गेले तरी 149 आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचेच राहील. मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

अजित पवार मुख्यमंत्री
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी एक तर मुख्यमंत्री पद रिक्त पाहिजे. नंतर संबंधित आमदारांचा पाठींबा लागतो. ते अनेक वर्षात राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे सांगितले तर काही चूक नाही. त्यामुळे ते साहजिक आहे. मी दुसर्‍यांदा महापौर झालो. त्याच्या आदल्या दिवशी प्रकाश अकोलकर माझ्याकडे आले. त्यांनी मला विचारले, तुम्ही आता निवृत्त होणार. तुम्ही आता विरोधी पक्ष नेता होणार का.. असे विचारले. मी सांगितले की, बाळासाहेब ठाकरेंनी केले तर मी विरोधी पक्ष नेताच काय राष्ट्रपती व्हायलाही तयार आहे हे माझं उत्तर होते.

हे सुद्धा वाचा : 

केशव उपाध्ये यांच्या बुडाला मिर्च्या का झोंबतात?

मराठा आरक्षणप्रकरणी शिंदे- फडणवीस सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मगरीचे नाहीत रक्ताचे आहेत; छगन भुजबळ विरोधकांवर कडाडले

Chhagan Bhujbal, Eknath Shinde, maharashtra Govt, state Govt, Chhagan Bhujbal statement on Eknath Shinde; Government will not fall even if Eknath Shinde’s chief ministership is gone

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी