30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरक्राईमप्रियकराला महागडे गिफ्ट देण्यासाठी प्रेयसीने लुटले शेजारच्याचे घर

प्रियकराला महागडे गिफ्ट देण्यासाठी प्रेयसीने लुटले शेजारच्याचे घर

मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा येथून 21 वर्षीय प्रेयसीने प्रियकराची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याच शेजाऱ्याचे घर लुटल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी तक्रारदार दिव्या सुरेश पटेल, रा. रश्मी गार्डन, एव्हरशाईन सिटी, नालासोपारा पूर्व यांनी आपल्या घरात ठेवलेली 10 लाख रुपयांची रोकड व दागिने गायब झाल्याची माहिती आचोळे पोलिसांना दिली.

मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा येथून 21 वर्षीय प्रेयसीने प्रियकराची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याच शेजाऱ्याचे घर लुटल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी तक्रारदार दिव्या सुरेश पटेल, रा. रश्मी गार्डन, एव्हरशाईन सिटी, नालासोपारा पूर्व यांनी आपल्या घरात ठेवलेली 10 लाख रुपयांची रोकड व दागिने गायब झाल्याची माहिती आचोळे पोलिसांना दिली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून पोलिसांना कोणताही सुगावा न लागल्याने सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. अशा स्थितीत पोलिसांनी फिर्यादीला विचारणा केली की, त्यांच्या घरातील रोकड व सोन्याबाबत आणखी कोणाला काही माहिती आहे का? त्यानंतर इमारतीत राहणाऱ्या इतर महिलांशी त्यांच्या घरात ठेवलेल्या सोन्याबाबत बोलणे झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. हा सुगावा म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी इमारतीतील प्रत्येक महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

नागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे मनमुराद ढोल वादन

खडसे यांच्या पत्नी पराभूत; जळगाव दूध संघात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण विजयी 

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी, महाजन यांचे पीए जळगाव दूध संघात विजयी; खडसे-महाजन यांची प्रतिष्ठा पणाला!

एका 21 वर्षीय महिलेने नुकतीच लाखो रुपयांची वस्तू खरेदी केल्याचे त्याने पाहिले. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, तपासादरम्यान त्यांना आढळले की मुलीच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये कोणताही बदल झाला नाही, तरीही तिने प्रियकरासाठी महागडे फर्निचर आणि 1 लाख रुपयांची बाईक खरेदी केली. अशा स्थितीत पोलिसांचा संशय तरुणीवर अधिक गडद झाला.

पोलिसांनी तरुणीची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. अटकेनंतर पोलिसांनी आरोपी तरुणीकडून सुमारे साडेचार लाख रुपये जप्त केले आहेत, तर उरलेली रोख रक्कम तिने वस्तू खरेदीसाठी खर्च केली आहे. मुलीच्या कबुलीजबाब आणि पुराव्याच्या आधारे पोलिसांनी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिस कोठडी सुनावली. त्याचवेळी मुलीच्या प्रियकराची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!