35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईममी धमक्यांना घाबरण्यातला नाही छगन भुजबळ

मी धमक्यांना घाबरण्यातला नाही छगन भुजबळ

धमकी आली म्हणून मी घरी बसणार नाही. अश्या किती धमक्या आल्या आणि मारण्याचा प्रयत्न झाला तरी मी माझी भूमिका सोडणार नाही, अशी विधान राज्याचे वरिष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. मंत्री भुजबळ यांना शुक्रवारी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणीच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत भुजबळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून संबंधित पत्रही पोलिसांना स्वाधीन केले आहे.पुढे बोलताना मंत्री भुजबळ यांनी, यापुर्वी दुरध्वनीद्वारे आणि संदेशाद्वारे अनेक धमक्या आल्या. त्यात आता पत्राची भर पडली आहे. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग आले आहे. परंतू काहीही झाले तरी मी माझी आयडॉलॉजी बदललेली नाही.

धमकी आली म्हणून मी घरी बसणार नाही. अश्या किती धमक्या आल्या आणि मारण्याचा प्रयत्न झाला तरी मी माझी भूमिका सोडणार नाही, अशी विधान राज्याचे वरिष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. मंत्री भुजबळ यांना शुक्रवारी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणीच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत भुजबळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून संबंधित पत्रही पोलिसांना स्वाधीन केले आहे.पुढे बोलताना मंत्री भुजबळ यांनी, यापुर्वी दुरध्वनीद्वारे आणि संदेशाद्वारे अनेक धमक्या आल्या. त्यात आता पत्राची भर पडली आहे. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग आले आहे. परंतू काहीही झाले तरी मी माझी आयडॉलॉजी बदललेली नाही. मी घरी बसू शकत नाही. जे परिणाम होतील, त्यासाठी आपली तयारी आहे. आता पोलिसांवर सर्व सोडून दिले आहे. पोलिसांना सर्व माहिती दिली असून पोलिस शोध घेतील असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी मंत्री भुजबळ यांना प्राप्त झालेल्या पत्रात काही फोन नंबर तसेच काही गाड्यांचे नंबरही दिले आहे. हत्येच्या कटासाठी पाच लोकांची बैठक झाली. ही बैठक एका हॉटेलसमोर झाली असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. आता सर्व काही पोलिसांवर सोपवले आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

५० लाखांची सुपारी
या पत्रात मंत्री छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी पाच जणांनी घेतली आहे. त्यासोबतच हे पाचही जण सध्या भुजबळांच्या शोधात आहेत. ते केव्हाही त्यांना जीवे मारू शकतात. हे पाचही जण ज्यांनी भुजबळ यांची सुपारी घेतली आहे. ते सध्या गंगापूर दिंडोरी चांदशी येथील हॉटेलमध्ये बसून आहे. या पाचही जणांना 50 लाख रुपयांना मंत्री भुजबळ यांची सुपारी देण्यात आली आहे. या गुंडांपासून भुजबळ साहेब तुम्ही सावध राहा, असा इशारा देण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा माफिया तुमचा गेम करणार असल्याचेही यामध्ये लिहीलेले आहे. हे गुंड रात्रभर छगन भुजबळ यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे. या हल्ल्यासंदर्भातील मिटींग ही चांंदशी परिसरातील हॉटेलमध्ये झाल्याचेही पत्रात सांगितले आहे. तर हे पत्र तुमचाच हितचिंतक शिंदे देशमुख या नावाने पाठवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी