28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून समज

नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून समज

गोदावरी महाआरतीवरून पुरोहित संघाकडून विरोध सुरु असून लाठ्याकाठ्या काढण्याची भाषा केली जात आहे. तसेच, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सदस्यांना गोदाघाट परिसरात फिरकू देणार नसल्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी संबंधित पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून समज देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची कडक ताकीद दिली आहे.ल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने गोदावरी महाआरती करण्यासाठी जवळपास ११ कोटी ६६ लाखांचा निधी दिला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची स्थापना करण्यात आली होती.

गोदावरी महाआरतीवरून पुरोहित संघाकडून विरोध सुरु असून लाठ्याकाठ्या काढण्याची भाषा केली जात आहे. तसेच, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सदस्यांना गोदाघाट परिसरात फिरकू देणार नसल्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी संबंधित पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून समज देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची कडक ताकीद दिली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने गोदावरी महाआरती करण्यासाठी जवळपास ११ कोटी ६६ लाखांचा निधी दिला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची स्थापना करण्यात आली होती.त्यामध्ये पुरोहित संघाच्या सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते यांना स्थान देण्यात आले होते. मात्र, पुरोहित संघाने आमच्या हक्कांवर गदा येणार असल्याचे सांगत या समितीला विरोध करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी एका ग्रामसभेचे आयोजन करून त्यामध्ये साधू महंतांनी लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा केली होती. तसेच, समितीच्या सदस्यांना गोदाघाटाकडे फिरकू देणार नसल्याची भाषा केल्याने हा वाद चिघळतच चालला होता.

दरम्यान पुरोहित संघाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत गोदा महाआरतीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. यामुळे गोदाघाट परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी शनिवार दि. १७ रोजी संध्याकाळी पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून सोमवार दि. १९ रोजी गोदावरी महाआरती दरम्यान कुठलाही गोंधळ घालू नये किंवा आरतीमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुरोहित संघाला दिला आहे. त्यामुळे आत्ता पुरोहित संघ आक्रमक भूमिका घेणार कि आपली तलवार म्यान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी बैठकीला अध्यक्ष सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित वारे, सौरभ शुक्ल, दिलीप शुक्ल, वैभव बेळे, शंकर शुक्ल, चैतन्य गायधनी, कल्पेश दीक्षित, आलोक गायधनी, हरीश खांदवे, सुजित गायधनी, सौरभ गायधनी हे उपस्थित होते.
कोट : गेल्या काही दिवसांपासून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघामध्ये गोदावरी महाआरतीवरून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्या अनुषंगाने रामकुंड आणि गोदाघाट परिसरात कुठेही अशांतता पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून योग्य समज दिली आहे. : मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी