33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईमजेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना हा सेक्स स्कँडल प्रकरणात देश सोडून फरार झाला आहे. रेवन्नाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक प्रज्वल एचडी देवेगौडा यांच्या बंगळुरू येथील घरी पोहोचले होते. यानंतर एचडी रेवन्ना यांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपी नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रज्वल यांनी अटकपूर्व जामिनासाठी आणि एचडी रेवन्ना यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात ( detained by police) घेतले आहे. तर त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) हा सेक्स स्कँडल प्रकरणात देश सोडून फरार झाला आहे. रेवन्नाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक प्रज्वल एचडी देवेगौडा यांच्या बंगळुरू येथील घरी पोहोचले होते. यानंतर एचडी रेवन्ना (HD Revanna) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपी नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रज्वल यांनी अटकपूर्व जामिनासाठी आणि एचडी रेवन्ना यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती.(JD(S) leader HD Revanna detained by police, Prajwal Revanna absconding)

जगातील सर्व इमिग्रेशन पॉईंट्सना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. कथित सेक्स टेप समोर आल्यानंतर रेवण्णा फरार झाले आहेत. ते जर्मनीत असल्याची माहिती आहे. या मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. जेडीएसने याआधीच रेवण्णा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
प्रज्वल हे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी मंत्री एचडी रेवण्णा यांचे पुत्र आहेत. जेडीएस हा एनडीएचा घटकपक्ष आहे. भाजप आणि जेडीएस एकत्र निवडणूक लढवत आहेत. प्रज्वल हे जेडीएसकडून हसन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात मतदान पार पडले आहे. मतदानानंतर त्यांनी देशातून पलायन केले आहे.

सेक्स टेप आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रज्वल अडचणीत सापडले आहेत. त्यांनी एसआयटीकडे हजर होण्यासाठी सात दिवसांचा वेळ मागितला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा बुधवारी एका सभेत म्हणाले होते की, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांसोबत भाजप कधीही राहू शकत नाही. या त्यांच्या वक्तव्याचा सिद्दरामय्या यांनी समाचार घेतला.प्रज्वल यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे. सिद्दरामय्या म्हणाले आहेत की, ‘काही व्हिडिओ समोर आले असून यात महिलांवर अत्याचार झाल्याचं दिसत आहे. यासंदर्भात ३३ व्हिडिओ क्लीप व्हायरल होत आहेत.’ निवडणुकीच्या काही दिवस आधीच हे व्हिडिओ समोर आले होते. प्रज्वल यांनी हजारो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना आणि त्यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. प्रज्वलचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल देशाबाहेर पळून गेला आहे. तो जर्मनीत असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी