27 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
Homeक्राईममाफिया आतीक अहमद आणि अशरफची गोळ्या घालून हत्या

माफिया आतीक अहमद आणि अशरफची गोळ्या घालून हत्या

माफिया आतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची मोठी घटना समोर आली आहे. प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही घटना घडली. आतिक आणि अशरफ या दोघांनाही १० हून अधिक गोळ्या घातल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आतीक आणि अशरफ यांना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन चालले होते. यावेळी येथे काही लोकांनी रोजदार नारेबाजी केली, यावेळी या दोघांचीही गोळ्याघालून हत्या केली. या घटनेत एक पोलिस शिपाई देखील जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराज येथील काँल्विन हाँस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आतीक आणि अशरफ यांना पोलीस घेऊन आले होते. यावेळी लोकांनी तेथे गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. याचदरम्यान दोन तरुणांनी आतिक आणि अशरफवर १० गोळ्यांचे राऊंड झाडले. हल्लेखोर येथे यापूर्वीच दबा धरुन बसले होते. हल्लेखोरांनी आतिक अहमदच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर ते पोलिसांना शरण आले.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री शर्लिन चोप्राचा विनयभंग; पोलिसांत तक्रार दाखल

पुलवामा : 40 जवानांचे बळी; मोदी म्हटले गप्प राहा !

मुंबई महापालिकेच्या कँटीनमधून 7 हजार चमच्यांची चोरी

नुकताच आतिक अहमद याच्या मुलाचा असदचा एनकाउंटर करण्यात आला होता. त्यानंतर आतिकला त्याच्या अंत्यसंस्काराला देखील जाता आले नव्हते. अतिक अहमदला एकुन पाच मुले असून असद हा तीन नंबरचा मुलगा होता. उमेश पाल हत्याकांडानंतर तो फरार होता. तर आतिकचा सर्वात मोठा मुलगा उमर हा लखनौ येथे तुरुंगात आहे. तर उमरचा धाकटा भाऊ अली हा नैनी येथील सेंट्रल जेलमध्ये आहे. तर अतिकचा चार नंबरचा मुलगा आणि पाच नंबरची दोन्ही मुले प्रयागराज येथील बालसुधारगृहात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी