30 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeक्राईममालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार

मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार

मालेगाव तालुक्यातील झोडगे परिसरातील एका पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा मालेगाव मध्ये गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोरांनी माजी महापौरांवर गोळीबार केला. सततच्या या घटनांनी मालेगाव हादरून गेले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा गंभीर जखमी झाले आहेत.

मालेगाव तालुक्यातील झोडगे परिसरातील एका पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा मालेगाव मध्ये गोळीबाराची (shot) घटना घडली. हल्लेखोरांनी माजी महापौरांवर गोळीबार (shot) केला. सततच्या या घटनांनी मालेगाव हादरून गेले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात (shot) माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा गंभीर जखमी झाले आहेत. (Malegaon Former mayor shot in the middle of the night)

या प्रकारामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. एएमआयएमचेचे मालेगाव महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर काल मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. या हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

ही घटना मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घटना घडली. अब्दुल मलिक रात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. एएमआयएच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नियंत्रणात आहे. मालेगाव शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी एएमआयएमकडून करण्यात आली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पथके रवाना केली आहेत. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी