29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्राईमप्राणघातक शस्त्राने मारहाण करून दरोडा टाकणारे इसम जेरबंद

प्राणघातक शस्त्राने मारहाण करून दरोडा टाकणारे इसम जेरबंद

दिनांक २३ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अनोळखी ४ ते ५ इसमांनी तपस्वी बंगला कॉलेजरोड या बंगल्यामध्ये घुसून धारदार चाकुने तेथील वयोवृध्द जोडप्यावर वार करून घरातील सोन्या चांदीचे दागिणे, रोख रक्कम, डेबिट कार्ड, केडीट कार्ड, बँकेचे कागदपत्र, पासपोर्ट असे बळजबरीने हिसकावुन नेले होते. त्याबाबत गंगापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता.हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व सामान्य नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्याने त्याचे तिव्र पडसाद शहरात उमटल्याने सदर गुन्हयातील आरोपीताचा तात्काळ शोध घेणेबाबत .श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुचना दिल्या होत्या.

दिनांक २३ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अनोळखी ४ ते ५ इसमांनी तपस्वी बंगला कॉलेजरोड या बंगल्यामध्ये घुसून धारदार चाकुने (Deadly weapon) तेथील वयोवृध्द जोडप्यावर वार करून घरातील सोन्या चांदीचे दागिणे, रोख रक्कम, डेबिट कार्ड, केडीट कार्ड, बँकेचे कागदपत्र, पासपोर्ट असे बळजबरीने हिसकावुन नेले होते. त्याबाबत गंगापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता.हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व सामान्य नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्याने त्याचे तिव्र पडसाद शहरात उमटल्याने सदर गुन्हयातील आरोपीताचा तात्काळ शोध घेणेबाबत .श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुचना दिल्या होत्या.(Man arrested for assaulting and robbing with deadly weapon)

त्या अनुषंगाने मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे नाशिक शहर, भा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये जबरी चोरी, दरोडा असे गुन्हे करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हेशाखा युनिट क. १ चेपोलीस पथके तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देवुन त्या भागातील सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास करून पोहवा/नाझीमखान पठाण व पोअं/आप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्तबातमीद्वारे वर नमुद गुन्हयातील दोन संशयीत इसम हे स्पेल्डर मोटार सायकल क्रमांक एम.एच १८-ई-६०८९ हिच्यावर बसुन गाडगे महाराज पुलाच्या खाली पंचवटी नाशिक या ठिकाणी येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी वपोनि श्री. मधुकर कड यांना कळयुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/हेमंत तोडकर, पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा/नाझीमखान पठाण, महेश साळुंके, रमेश कोळी, पोना/मिलींद परदेशी, पोअं/ आप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे अशांनी गाडगे महाराज पुलाखाली पंचवटी, नाशिक येथे सापळा लावुन मोटार सायकल वरील दोन इसमांना शिताफीने पकडुन ताब्यात घेतले.

सदर इसम नामे १) संदिप भारत रणबावळे, मुळ रा-मु.पो करंजी गरड ता. रिसोड जि.वाशिंद, सध्या रा-श्रीराम एम्पायर बिल्डर नमन शहा यांच्या साईटवर कुलकर्णी गार्डन, शरणपुररोड नाशिक, २) महादेव बाबुराव खंदारे, रा-कॉलेजरोड डिसुजा कॉलेनी चाफेकर यांचे घरामध्ये, कॉलेजरोड नाशिक असे सांगुन त्यांना विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचे साथीदार अरूण उर्फ बबन गायकवाड, नंदकिशोर रणबावले व एक विधीसंघर्षित बालक यांचेसह केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन मोटार सायकल कमांक MH 18 E 6089 दोन मोबाईल फोन व रोख रूपये ४७२०/- असा ७४,७२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी संदिप रणबावळे याचेकडे अधिक विचारपुस करता त्याने बिल्डर अजित पवार, याने २ महिन्यापूर्वी कॉलेजरोड येथील तपस्वी बंगला येथे जावुन तेथे राहणा-यांकडुन घर खाली करून दिल्यास ८ ते १० टक्के कमिशन देईन अशी सुपारी दिल्याने वरील आरोपीतांनी सदर ठिकाणी तेथे राहणारे वयोवृध्द आजी व बाबा यांना धमकी देवून, त्यांना प्राणघातक शस्त्राने मारहाण करून घरातील सोन्या चांदीचे दागिणे, रोख रक्कम, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, बँकेचे कागदपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदार कार्ड वगैरे असे बळजबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेलो असल्याची कबुली देवुन त्यापैकी मोबाईल फोन व कागदपत्रे असा ४०,०००/- किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. वरील आरोपीतांकडुन एकुण १,१४,७२०/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील आरोपीतांना पुढील कारवाईकामी गंगापुर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

हि कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा.श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा.डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/हेमंत तोडकर, पोउनि/चेतन श्रीवंत, पोहवा/नाझीमखान पठाण, रमेश कोळी, महेश साळुंके, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, पोना/मिलींद परदेशी, प्रशांत भरकड, पोअं/ आप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चासपोउनि/किरण शिरसाठ, पोअं/समाधान पवार व सपोउनि वसंत पांडव, सुरेश माळोदे, सुगन साबरे, पोहवा / राजेंद्र लोखंडे अशांनी केलेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी