30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरात अनेक दुकानावर इंग्रजी पाट्या कायम

नाशिक शहरात अनेक दुकानावर इंग्रजी पाट्या कायम

मराठी पाट्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे मात्र शहरात अनेक ठिकाणी आजही इंग्लिश पाट्या दिमाखाने मिरवल्या जात आहेत. त्याबाबत नाशिक मनपा प्रशासनाने शहरातील दुकानदारांना नोव्हेंबरमध्येच अल्टिमेटम दिला होता. मात्र त्यानंतर मनपाचे काही अधिकारी लोकसभा निवडणुकीसाठी गेल्याने हा विषय मागे पडला होता. याबाबत आता प्रभारी कारभार असलेल्या अधिकाऱ्यांनी ९० टक्के पाट्या मराठी असल्याचा दावा करीत बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे.मराठी पाट्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल्याची केवळ सुनावणी देताना न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या लावण्याचे सूचना दिल्या होत्या .

मराठी पाट्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे मात्र शहरात अनेक ठिकाणी आजही इंग्लिश पाट्या (English plates) दिमाखाने मिरवल्या जात आहेत. त्याबाबत नाशिक मनपा प्रशासनाने शहरातील दुकानदारांना नोव्हेंबरमध्येच अल्टिमेटम दिला होता. मात्र त्यानंतर मनपाचे काही अधिकारी लोकसभा निवडणुकीसाठी गेल्याने हा विषय मागे पडला होता. याबाबत आता प्रभारी कारभार असलेल्या अधिकाऱ्यांनी ९० टक्के पाट्या मराठी असल्याचा दावा करीत बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे.मराठी पाट्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल्याची केवळ सुनावणी देताना न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या लावण्याचे सूचना दिल्या होत्या .(English plates continue at many shops in Nashik city )

मात्र एप्रिल मधेही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही . त्यामळे आजही इंग्रजी अक्षरातील पाट्या शहरात अनेक ठिकाणी झळकत आहेत .
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही इंग्रजी पाट्या शहरात कायम असल्याने नोव्हेंबर मध्ये दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश ,मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले होते. विभागीय अधिकाऱ्यांनीदेखील या विषयात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला होता. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दोन दिवसात मराठी पाट्या लावण्यासाठी काय कारवाई केली, याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना नोव्हेंबर महिन्यातच दिल्या होत्या मात्र पाच महिने उलटूनही यावर कोणती कार्यवाही झालेली नाही.

मनपातर्फे ५३ हजार बजावल्या होत्या नोटीसा
शहरामध्ये ५३ हजार खासगी आस्थापनांना इंग्रजी पाट्यांचे रूपांतर मराठीत करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती, कालावधीमध्ये मराठीकरण झाले नाही. आता विभागीय अधिकाऱ्यांमार्फत थेट दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसेने नाशिक मध्ये आक्रमक पवित्रा घेत नोव्हेंबर मध्ये आंदोलन केले होते. शहरातील कॉलेज रोड परिसरात नोव्हेंबर महिन्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली होती. मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशाराही यावेळी मनसेकडून व्यापाऱ्यांना देण्यात आला होता.

शहरातील ९० टक्के दुकाने आणि संस्था यांचे फलक मराठी मध्ये आहेत. मनपा प्रशासन याचा सातत्याने आढावा घेत आहे. याबाबत उद्या ( २५ एप्रिल ) रोजी मनपा मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विवेक भदाणे , प्रभारी उपायुक्त कर

महापालिकेला तीन ते चार महिन्यापूर्वी आम्ही लेखी पत्र दिले होते. इतर राज्यात प्रादेशिक भाषेत पाट्या असताना महाराष्ट्र मध्ये मराठी पाट्या नसणे हि मोठी दुर्देवी बाब आहे. याबाबत मनसेने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे . आम्ही पुन्हा एकदा महापालिकेला या विषयाबाबत पत्र देऊन मुदत मागू . त्या वेळेत मराठी पाट्या झाल्या नाहीत तर मनसे स्टाईल ने धडा शिकवला जाईल.
संदीप भवर, प्रदेश उपाधकश्य, मनसे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी