28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमनाशिकमध्ये टोळीयुद्धातून मध्यरात्री गोळीबार

नाशिकमध्ये टोळीयुद्धातून मध्यरात्री गोळीबार

नाशिकमध्ये टोळीयुद्धातून रविवारी मध्यरात्री गोळीबार (Midnight firing) झाल्याची घटना घडली आहे. दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एका टोळीकडून दुसऱ्या टोळीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, यातील सहा जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारापाठोपाठत्रिमुर्ती चौकात तलवारी नाचवत परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी अंबड पोलिसांकडून आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोन सराईत गुन्हेगारांमध्ये रविवारी वाद झाले. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता.(Midnight firing during gang war in Nashik)

याप्रकरणी अंबड पोलिसांकडून आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोन सराईत गुन्हेगारांमध्ये रविवारी वाद झाले. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. मात्र रात्री 11.30 च्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदेने वैभव शिर्केला बोलावून घेतले. दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. दोंदेने गावठी पिस्तूल काढत ते वैभववर रोखले. जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली. मात्र नेम चुकल्याने वैभव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हेशाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने या ठिकाणी पाहणी केली.

दरम्यान, भर वस्तीत भर रस्त्यात रविवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. आवाज झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. दोन टोळ्या समोरासमोर आल्या. आरडाओरड करणाऱ्यांच्या हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला. भयभीत झालेल्या नागरिकांनी आपापल्या इमारतीत धाव घेत घरांचा दरवाजा लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी सुरू केली. दरम्यान, भर वस्तीत भर रस्त्यात रविवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.आवाज झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. दोन टोळ्या समोरासमोर आल्या. आरडाओरड करणाऱ्यांच्या हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला. भयभीत झालेल्या नागरिकांनी आपापल्या इमारतीत धाव घेत घरांचा दरवाजा लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी सुरू केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी