27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईममुंबई पोलीस लावणार सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाचा छडा

मुंबई पोलीस लावणार सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाचा छडा

पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे कथित व्हिडिओ प्रकरण बाहेर आले. याबाबत विधान परिषदेत मुद्दा उपस्थित झाल्यावरगृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही, सोमय्या यांच्यासंबंधातील आक्षेपार्ह व्हिडीओची सखोल चौकशी केली जाईल,असे स्पष्ट केले होते. आता या प्रकरणाचा तपास तांत्रिक बाबी आणि सायबर तज्ज्ञांच्या साहाय्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट न १० कडून करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणावरून विधिमंडळ अधिवेशनात घमासान घडून आले. ‘महिलांचे शारिरीक शोषण करणाऱ्या सोमय्यांना पाठीशी घालणार का?’ असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. यावर बोलताना फडणवीसांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही, सोमय्या यांच्यासंबंधातील आक्षेपार्ह व्हिडीओची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर आता मुंबई पोलिस चौकशीच्या दृष्टीने सक्रिय झाले आहेत.

सोमय्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात विविध राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांचा हा मुद्दा वरिष्ठ सभागृहात लावून धरला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दानवेंनी आठ तासांच्या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह सादर केला. याची चौकशीचा मागणी केली. विधान परिषेदेत हा मुद्दा उपस्थित झाल्याने मुंबई पोलिसांनी तपास करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

हे सुद्धा वाचा
अबू आझमींनी पुन्हा वंदे मातरम् वाद उकरून काढला; सभागृह 10 मिनिटासाठी तहकूब

अर्धेअधिक कोकण पाण्याखाली; नद्या दुथडी भरून वाहतातहेत, गावांचा संपर्क तुटला

उद्धव ठाकरे, अजित पवार भेटीने राजकीय चर्चांना उत  

मुंबई पोलीस गुन्हे शाखेने किरीट सोमय्या यांच्या प्रकरणातील तपास सुरू केला आहे. तांत्रिक बाबी आणि सायबर तज्ज्ञांच्या साहाय्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट न १० कडून या व्हिडिओचा छडा लावण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिल्याचे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी