31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईमनाशिक पैसे दिले नाहीत म्हणून खून करून मृतदेह जाळला

नाशिक पैसे दिले नाहीत म्हणून खून करून मृतदेह जाळला

संशयित सराईत गुन्हेगारांनी या युवकाचा मृतदेह मोखाडा येथे जाळून फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सराईत गुन्हेगार संदेश चंद्रकांत काजळे, ३५, रा. माताजी चौक, विजय नगर, नवीन सिडको, मूळ रा. आडगाव नाशिक याचे आर्थिक वादातून शुक्रवार दि. ९ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास संशयित नितीन उर्फ पप्पू कचरू चौघुले, रणजित संजय आहेर, राजवाडा, पंचवटी, स्वप्नील दिनेश उन्हवणे, २३, राजवाडा, पंचवटी, पवन संजय भालेराव, रा. प्रभात वंदन अपार्टमेंट, मालेगाव स्टॅन्ड, करण अनिल डेंगळे, रा. त्रंबकेश्वर यांच्याशी निमाणी बस स्टॅन्ड समोरील इमारतीच्या पार्किंग मध्ये दारू पित असताना गाडीच्या पैशांवरून शाब्दिक वाद सुरु झाला.

संशयित सराईत गुन्हेगारांनी या युवकाचा मृतदेह मोखाडा येथे जाळून फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सराईत गुन्हेगार संदेश चंद्रकांत काजळे, ३५, रा. माताजी चौक, विजय नगर, नवीन सिडको, मूळ रा. आडगाव नाशिक याचे आर्थिक वादातून शुक्रवार दि. ९ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास संशयित नितीन उर्फ पप्पू कचरू चौघुले, रणजित संजय आहेर, राजवाडा, पंचवटी, स्वप्नील दिनेश उन्हवणे, २३, राजवाडा, पंचवटी, पवन संजय भालेराव, रा. प्रभात वंदन अपार्टमेंट, मालेगाव स्टॅन्ड, करण अनिल डेंगळे, रा. त्रंबकेश्वर यांच्याशी निमाणी बस स्टॅन्ड समोरील इमारतीच्या पार्किंग मध्ये दारू पित असताना गाडीच्या पैशांवरून शाब्दिक वाद सुरु झाला. यावेळी संशयित रणजित आहेर याने संदेशच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्याला आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनात टाकून त्याचे अपहरण करत घेऊन गेला. याबाबत संदेशचा चुलत भाऊ प्रितेश विलास काजळे, ३२, रा. रा. माताजी चौक, विजय नगर, नवीन सिडको, मूळ रा. आडगाव नाशिक याने पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित स्वप्नील उन्हवणे याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच स्वप्नील याने संदेश याचे संशयित रणजित आहेर, नितीन चौघुले, पवन भालेराव यांनी संदेशचे अपहरण केल्याचे सांगितले. निमाणी परिसरातून संदेशचे अपहरण केल्यानंतर रणजित आहेर, स्वप्नील उन्हवणे यांनी गाडीमध्ये संदेशाच्या शरीरावर चॉपरने वार केले. यामध्ये अतिरक्तस्राव झाल्याने संदेशचा मृत्यू झाला. या संशयितांनी संदेशचा मृतदेह गाडीतूनच त्रंबककेश्वरच्या पुढे असलेल्या मोखाडा येथील वाघ नदीच्या परिसरातील जंगलात निर्जनस्थळी नेत त्याचा मृतदेह गाडीच्या बाहेर काढला आणि त्यावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली स्वप्नीलने पोलिसांसमोर दिली आहे. याबाबत पोलिसांनी स्वप्नील उन्हवणे आणि पवन भालेराव यांना ताब्यात घेतले असून फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहे.

सराईत गुन्हेगार संदेश काजळे याचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच संबंधित संशयितांच्या मोबाईल नंबरवरून त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार दिवसरात्र पोलीस पथकाने शोध मोहीम राबवत संशयितांना ताब्यात घेत खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. यातील संशयित देखील सराईत गुन्हेगार असून दोघांमध्ये आर्थिक वाद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

पंचवटी परिसरातील वाघाडी येथून ऑक्टोबर २०१५ रोजी अशाच प्रकारे जालिंधर उर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले या युवकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. संशयितांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ज्वाल्याचा मृतदेह कसारा घाटात जाळून टाकण्यात आल्याची घटना घडली होती. संदेश याची देखील हत्या अशाच पद्धतीने करण्यात आल्याने या घटनेला उजाळा मिळाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी