महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्हाच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी मा. राजेंद्र वाघ यांना दुष्काळी परिस्तिथीने हैराण असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्या बाबत निवेदन देण्यात आले .शासनाने जवळपास १५०० महसूल मंडळात अधिकृत दुष्काळ जाहीर केला आहे. खरेतर संपूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळी परिस्तिथी असताना शासनाने दुष्काळी निकषात उर्वरित महसूल मंडळे बसत नसल्याचे कारण देत महारष्ट्रातील उर्वरित महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला नाही. परंतु महाराष्ट्रातील ज्या महसूल मंडळामध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे त्याठिकाणी दुष्काळ जाहीर होऊन जवळपास दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली नाही.या गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीची दखल त्वरित घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी माजी सैनिकांच्या व मनसे च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक,प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड .रतनकुमार इचम,जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे,जिल्हाउपाध्यक्ष संदिप किर्वे,
शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष मनोज ढिकले,मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर,जिल्हाउपाध्यक्ष रमेश खांडबहाले,जिल्हाउपाध्यक्ष मनोज घोडके,सरचिटणीस मिलिंद कांबळे, जिल्हाध्यक्ष महिला सेना वैशाली पोतदार,तालुकाध्यक्ष सिन्नर महिला सेना भाग्यश्री ओझा,निफाड तालुकाध्यक्ष संजय मोरे,सचिन ओझ,तुषार गांगुर्डे,अमित गांगुर्डे, संजय देवरे,शैलेश शेलार,किरण पवार आदि सह पदाधिकारी उपस्थित होते.
सदर निवेदनाची जिल्हा प्रशासनाने अतिशय गंभीरपणे दखल घ्यावी व दुष्काळी भागातील केलेल्या उपाययोजना बाबत त्वरित लेखी स्वरुपात खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली.