33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeक्राईमनाशिक अंबड पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या झाडून आत्महत्या

नाशिक अंबड पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या झाडून आत्महत्या

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात आज (20 फेब्रुवारी, मंगळवार) सकाळी एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यातील त्यांच्या केबिनमध्ये सरकारी रिव्हॉल्वरनं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, अशोक नजन हे काल शिवजयंतीच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. मात्र त्यांनी आज अशी अचानक आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळालेलं नाही.सरकारी रिव्हॉल्वरनं डोक्यात गोळी घातली : पोलीस निरीक्षक अशोक नजन हे काल उशिरापर्यंत शिवजयंतीसाठी बंदोबस्त करून आज सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले.

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात आज (20 फेब्रुवारी, मंगळवार) सकाळी एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी पोलीस ठाण्यातील त्यांच्या केबिनमध्ये सरकारी रिव्हॉल्वरनं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, अशोक नजन हे काल शिवजयंतीच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. मात्र त्यांनी आज अशी अचानक आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळालेलं नाही.

सरकारी रिव्हॉल्वरनं डोक्यात गोळी घातली : पोलीस निरीक्षक अशोक नजन हे काल उशिरापर्यंत शिवजयंतीसाठी बंदोबस्त करून आज सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले. ते पोलीस स्टेशनमधील त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांनी स्वतःच्या सरकारी रिव्हॉल्वरनं डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. सकाळी सर्वांचा रोल कॉल असतो. तेव्हा सर्व कर्मचारी बाहेर उभे होते. पोलीस निरीक्षक साहेब अजून का आले नाहीत म्हणून एक पोलीस कर्मचारी त्यांना बोलावण्यास गेला असता त्यांना अशोक नजन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तातडीनं याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

रुग्णालयात पोहचण्याआधीच मृत्यू : यानंतर अशोक नजन यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. अशोक नजन यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी