28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक करंजगाव येथे शिवजयंती मिरवणुक उत्साहात

नाशिक करंजगाव येथे शिवजयंती मिरवणुक उत्साहात

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी शिवजयंतीनिमित्त शिवपुतळापूजन करून संबळ वाद्यांच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.पुणे येथील शिवचरित्रकार हभप प्रा.डॉ गजानन महाराज व्हावळ यांचे कीर्तन करंजगाव ग्रामपालिका पटांगनात झाले. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक पराक्रम त्यांनी पोवाडारुपी कीर्तनातून सांगताना त्यांनी ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनास करंजगाव भजनी मंडळाने सहकार्य केले. दुसऱ्या दिवशी करंजगाव जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व मविप्रच्या जनता विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनीनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी शिवजयंतीनिमित्त शिवपुतळापूजन करून संबळ वाद्यांच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.पुणे येथील शिवचरित्रकार हभप प्रा.डॉ गजानन महाराज व्हावळ यांचे कीर्तन करंजगाव ग्रामपालिका पटांगनात झाले. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक पराक्रम त्यांनी पोवाडारुपी कीर्तनातून सांगताना त्यांनी ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनास करंजगाव भजनी मंडळाने सहकार्य केले. दुसऱ्या दिवशी करंजगाव जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व मविप्रच्या जनता विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनीनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.जि.प शाळेच्या कल्पना बावकर मॅडम व मविप्रचे हेमंत टिळे सर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल यावेळी शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

शिवजयंतीनिमित्त सकाळी शिवपुतळ्याचे पूजन झाल्यानंतर शालेय मुलींच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. त्यानंतर जि.प शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाण्यावर छान नृत्य सादर केले. त्यानंतर छत्रपत्री शिवरायांच्या पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली. पालखी मिरवणुक ग्रामपालिका पटांगण, शनी चौक, हनुमान मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, श्रीराम मंदिर, खंडेराव मंदिरमार्गे ग्रामपालिका पटांगणात संपन्न करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी मिरवणुकीत सहभागी होत संबळ वाद्यांवर नाचण्याच्या आनंद लुटला. “जय भवानी,जय शिवाजी” “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “धर्मवीर संभाजी महाराज की जय” या घोषनांनी करंजगाव दुमदुमून गेले होते. करंजगाव ग्रामपालिका व करंजगाव हनुमान सोसायटी येथेही शिवजयंतीनिमित्त शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी