35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमपंचवटी परिसरात पेठरोडवर हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पंचवटी परिसरात पेठरोडवर हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पंचवटी परिसरात पेठरोडवर हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या एका अल्पवयीन संशयितासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संशयितांकडून ४ हजार रुपये किंमतीचे गुप्ती, चॉपर आणि कोयता पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार डी. पी. नाईक करीत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, गुन्हे शाखा युनिट एक मधील पोअं नितीन जगताप यांना माहिती मिळाली होती कि, शुक्रवार दि. १५ रोजी संध्याकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास काही संशयित आपली दहशत पसरविण्यासाठी पेठरोड परिसरात हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरत आहे.

पंचवटी परिसरात पेठरोडवर हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या एका अल्पवयीन संशयितासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संशयितांकडून ४ हजार रुपये किंमतीचे गुप्ती, चॉपर आणि कोयता पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार डी. पी. नाईक करीत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, गुन्हे शाखा युनिट एक मधील पोअं नितीन जगताप यांना माहिती मिळाली होती कि, शुक्रवार दि. १५ रोजी संध्याकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास काही संशयित आपली दहशत पसरविण्यासाठी पेठरोड परिसरात हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरत आहे. nashik news

याबाबत मिळालेली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता कड यांनी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोहवा देविदास ठाकरे, धनजंय शिंदे, महेश साळुंके, पोना मिलिंदसिंग परदेशी, पोअं विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांचे पथक तयार करून पेठरोडवरील राहुलवाडी येथील समाज मंदिराजवळ पाठवले होते.

यावेळी संशयित आरोपी दिपक संदिप शेवाळे, १८, रा-गल्ली नंबर ४, समाज मंदिराजवळ, राहुलवाडी पंचवटी, नाशिक, खुशाल अशोक शिंदे, २१, रा-मच्छी मार्केट, गल्ली नं ४, राहुलवाडी पंचवटी, नाशिक आणि एक अल्पवयीन संशयित हे आपल्या हातात १ कोयता, २ गुप्ती आणि १ चॉपर घेऊन परिसरात दहशत माजविताना दिसून आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याजवळील शास्त्रे जप्त केली आहे. या संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी