31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमपुण्याहून नाशिककडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात

पुण्याहून नाशिककडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात

जिल्ह्यातील सिन्नर-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथे रविवारी चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला आहे. महाकाली ट्रॅव्हलची खाजगी बस पुण्याकडून नाशिकच्या दिशेने येत होती. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील ‘इंटरचेंज’ पॉइंटजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात पंधरा ते वीस जण जखमी तर चार-पाच प्रवाशी गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली आहे. वावी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. जखमींना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सिन्नर-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथे रविवारी चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात(Accident) झाला आहे. महाकाली ट्रॅव्हलची खाजगी बस पुण्याकडून नाशिकच्या दिशेने येत होती. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील ‘इंटरचेंज’ पॉइंटजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात पंधरा ते वीस जण जखमी तर चार-पाच प्रवाशी गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली आहे. वावी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. जखमींना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.(Private travel bus coming from Pune to Nashik meets with accident)

नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदेगों देफाटा येथील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस (एम एच 14 सीडब्ल्यू 9072) खाली कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर 34 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती वावी पोलिसांनी दिली आहे. महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अपघात नेमका कशामुळे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघातानंतर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड, नितीन कदम तसेच अन्य सहकारी आणि महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अपघात झाल्यानंतर दहा मिनिटातच नांदूरशिंगोटे व सिन्नर येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल होत स्थानिक ग्रामस्थ व पोलीस यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातात मृत झालेल्या प्रवाशाचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (३५) रा. अहमदाबाद, गुजरात येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.दरम्यान अपघातात मृत झालेल्या प्रवाशाचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (३५) रा. अहमदाबाद, गुजरात येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जखमी प्रवाशांची नावे…
अब्दुल रज्जाक, सोनाली शेजवळ, मालता शेजवळ, सुंधी सोनी, अशरीध रेड्डी, प्रकाश कौटि, प्रियंका आलेवर, पवन पांचाळ, शुभम जाधव, भगवान इंगळे, अनिल निकमले, मुकेश सोळंकी, शिवाजी नालेकर, राणी कांची, अमित पांचाळ, निखिल कांडेकोरी, प्रियांशु अलवार, महेश बिडवे, तुषार मिस्त्री, पवन पावरा, निखिल कांडेकोरी, प्रियांशु अलवार,महेश बिडवे, राधेश्याम पावरा, रितेश भिल, बशीर चेतन सूर्यवंशी, सुरेश वाघेला मोहम्मद अली, मेहुल प्रजापती, सोनम पवार, विवेक मिस्त्री यांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी