32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमआयफोनच्या बनावट साहित्याची साठेबाजी करून त्याची बाजारात विक्री करणारे चौघे अटकेत

आयफोनच्या बनावट साहित्याची साठेबाजी करून त्याची बाजारात विक्री करणारे चौघे अटकेत

महागडे आयफोनसाठी लागणारे साहित्य हुबेहुब त्यासारखेच बनावट साहित्याची साठेबाजी करून त्याची बाजारात विक्री केल्याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने प्रधान पार्कमधील चार दुकानांवर छापे टाकत, सुमार चार लाखांचे बनावट अक्सेसरीज जप्त केली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात कॉपीराईड ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. रुपाराम जेठाराम चौधरी (४०, रा. क्रांतीनगर, पंचवटी. मूळ रा. बाडमेर, राजस्थान), बाबुलाल नेथीराम चौधरी (२८, रा. समर्थ व्हिला, क्रांतीनगर, पंचवटी. मूळ रा. पावलिता, जालोर, राजस्थान), दिलीप ढोलाराम बिष्णोई (२६, रा. सदगुरु अपार्टमेंट, गोळे कॉलनी, अशोकस्तंभ, नाशिक. मूळ रा. लियादरा, सांचोरा, राजस्थान), कमलेशकुमार सुजाराम चौधरी (२३, रा. रिद्धीसिदधी अपार्टमेंट.ओमनगर, पंचवटी. मूळ रा. भीनमाल, जालोरा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

महागडे आयफोनसाठी (iphone) लागणारे साहित्य हुबेहुब त्यासारखेच बनावट साहित्याची साठेबाजी करून त्याची बाजारात विक्री केल्याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने प्रधान पार्कमधील चार दुकानांवर छापे टाकत, सुमार चार लाखांचे बनावट अक्सेसरीज जप्त केली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात कॉपीराईड ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. रुपाराम जेठाराम चौधरी (४०, रा. क्रांतीनगर, पंचवटी. मूळ रा. बाडमेर, राजस्थान), बाबुलाल नेथीराम चौधरी (२८, रा. समर्थ व्हिला, क्रांतीनगर, पंचवटी. मूळ रा. पावलिता, जालोर, राजस्थान), दिलीप ढोलाराम बिष्णोई (२६, रा. सदगुरु अपार्टमेंट, गोळे कॉलनी, अशोकस्तंभ, नाशिक. मूळ रा. लियादरा, सांचोरा, राजस्थान), कमलेशकुमार सुजाराम चौधरी (२३, रा. रिद्धीसिदधी अपार्टमेंट.ओमनगर, पंचवटी. मूळ रा. भीनमाल, जालोरा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.(Four arrested for hoarding fake iPhone content and selling it in market )

यशवंत शिवाजी मोहिते (रा. नेरूळ, नवी मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार, आयफोन ॲपल कंपनीच्या मोबाईलचे बनावट ॲक्सेसरीजची नाशिकमधील एम.जी. रोडवरील बाजारपेठेत खुलेआम विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी खात्री केली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी शहर गुन्हेशाखेकडे तक्रार केली. त्यानुसार, शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने एम.जी. रोडवरील प्रधान पार्कमधील चार संशयितांच्या दुकानावर छापे टाकले. त्यावेळी आयफोन ॲपल कंपनीच्या मोबाईलसाठी लागणारे युएसबी केबल, एअरपॉड, इअरपॉड, स्क्रीनगार्ड, ॲडप्टर, बॅक कव्हर आदी ॲक्सेसरीज ओरीजनल आयफोनसाठी लागणारे ॲक्सेसरीजसारखीच बनावट होते. या बनावट ॲक्सेसरीजचा साठा करून संशयितांकडून विक्री केली जात होती. यामुळे कंपनीच्या कॉपीराईट हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला. तसेच, ३ लाख ८६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक सुरवाडे हे करीत आहेत.या बनावट ॲक्सेसरीजचा साठा करून संशयितांकडून विक्री केली जात होती. यामुळे कंपनीच्या कॉपीराईट हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला. तसेच, ३ लाख ८६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक सुरवाडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक लाड, रंजन बेंडाळे, गणेश भामरे, भारत डंबाळे, विनायक आव्हाड, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, बी.व्ही. राऊत, विठ्ठल चव्हाण, अर्चना भड, मंगल जगताप यांच्या पथकाने केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी