31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमसेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी, पलॅटस व १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच दागिन्याचा अपहार केला म्हणुन सेवा निवृत्त पोलिस अधिकारी यांनी सुन व तीच्या प्रियकर विरोधात अंबड पोलिस ठाणे येथे खंडणी चा गुन्हा दाखल केला आहे . या बाबत पोलिसांनी सांगितले की, साहेबराव पाटील ( वय ६५ ) सेवा निवृत्त पोलिस उपायुक्त राहणार कर्मयोगी नगर यांनी अंबड पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली आहे की .

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी, पलॅटस व १० कोटी रुपयांची खंडणी (Ransom ) मागितली. तसेच दागिन्याचा अपहार केला म्हणुन सेवा निवृत्त पोलिस अधिकारी ((Retired police officer) यांनी सुन व तीच्या प्रियकर विरोधात अंबड पोलिस ठाणे येथे खंडणी (Ransom ) चा गुन्हा दाखल केला आहे . या बाबत पोलिसांनी सांगितले की, साहेबराव पाटील ( वय ६५ ) सेवा निवृत्त पोलिस उपायुक्त राहणार कर्मयोगी नगर यांनी अंबड पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली आहे की .(Retired police officer demands Rs 10 crore ransom from daughter-in-law)

संशयित आरोपी सुन स्नेहा रोशन पाटील व तिचा प्रियकर अंजिक्य पाटील राहणार नेरूळ मुंबई यांनी संगनमत करुन कट कारस्थान रचुन सुन स्नेहाने माझे व माझ्या कुटुंबियांचे मानसिक खच्चीकरण व्हावे, समाजामध्ये माझी बदनामी करुन, समाजात माझा मान सन्मान, प्रतिष्ठा, नावलौकिक व प्रतिमा मलीन करुन स्नेहा व अजिक्य पाटील यांचे अनैतिक संबंधावर पांघरुण घातले आहे.

सुन स्नेहा हिने दुष्ट, दुषित व अप्रामाणिक हेतु डोळ्यासमोर ठेवून आमचे आर्थिक नुकसान करण्याच्या इरादयाने, व स्वतःच्या आर्थिक फायदा करण्याच्या हेतूने मला व पत्नी शोभा, तसेच मुलगा रोशन यांना धमक्या देऊन, भिती घालून तसेच माझे पत्नीला धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला आमच्या ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये माझ्या कुटुंबियांकडून जॅग्वार गाडी, पलॅटस व १० कोटी रुपयांची खंडणी सुन स्नेहाने मागितली. तसेच आमचे दागिण्याचा सुन स्नेहा हिने अपहार केला आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी सुन स्नेहा रोशन पाटील व तिचा प्रियकर अजिक्य पाटील यांचे विरुध्द खंडणीचा भादवी कलम ३२३ / ३८५ / ४०६ / ५०० / ५o४ / ५०६ / १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी