32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमनाशिक पवननगर परिसरातील कुंटणखाना बंदसाठी ठिय्या आंदोलन

नाशिक पवननगर परिसरातील कुंटणखाना बंदसाठी ठिय्या आंदोलन

पवन नगर परिसरातील एका इमारतीमध्ये राहत्या घरात अनेक दिवसांपासून कुंटणखाना खुलेआम सुरू असल्याने परिसरातील महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी येणारे युवक तसेच ग्राहक आजूबाजूच्या नागरिकांच्या घरांमध्ये पत्ता विचारतात, यामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून या ठिकाणी अवैध सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी अंबड पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवारी (ता.२७) ठिय्या दिला.तसेच मागणीचे निवेदन देत आंदोलनाचा इशाराही महिलांनी दिला आहे. पवन नगर येथील गणपती मंदिराच्या बाजूला सिडकोच्या एका इमारतीमध्ये वर्षानुवर्षे अवैध देहविक्री व्यवसाय सुरू आहे.

पवन नगर परिसरातील एका इमारतीमध्ये राहत्या घरात अनेक दिवसांपासून कुंटणखाना खुलेआम सुरू असल्याने परिसरातील महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी येणारे युवक तसेच ग्राहक आजूबाजूच्या नागरिकांच्या घरांमध्ये पत्ता विचारतात, यामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून या ठिकाणी अवैध सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी अंबड पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवारी (ता.२७) ठिय्या दिला.

तसेच मागणीचे निवेदन देत आंदोलनाचा इशाराही महिलांनी दिला आहे. पवन नगर येथील गणपती मंदिराच्या बाजूला सिडकोच्या एका इमारतीमध्ये वर्षानुवर्षे अवैध देहविक्री व्यवसाय सुरू आहे. एक महिला इतर महिलांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात उतरण्यास भाग पाडत असून या ठिकाणी मोठा कुंटणखाना सुरू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सकाळी तसेच रात्रीच्या वेळी काही समाजकंटक तसेच मद्यपान करून येणारे युवक आरडाओरड करतात, गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येऊ लागले आहेत. यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या महिला वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी