33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपा पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी तीन ठेकेदार शर्यतीत

नाशिक मनपा पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी तीन ठेकेदार शर्यतीत

मनपाकडून शहरातील सातपूर,सिडको, पश्चिम या विभागासाठी सुरु असलेल्या पेस्ट कंटोल ठेक्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत.मुंबई येथील सूरज एन्ट्रीप्रायजेस,सोबेस्ट सर्व्हिसेस व नाशिक येथील एस अॅण्ड आर या तीन कंपन्या असून त्यांच्या कागदपत्रांची तांत्रिक तपासणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वीच पेस्ट कंट्रोलचा ठेका मार्गी लावण्याचा मलेरीया विभागाचा प्रयत्न आहे. धूर फवारणी ठेक्याची मुदत मागील वर्षी सहा जुलैला संपुष्टात आली होती. महत्वाचे म्हणजे याआधी सहा विभागासाठी एकाच ठेकेदाराकडून धूर फवारणी केली जायची. नंतर यामध्ये बदल करण्यात येउन दोन टप्पे करण्यात आले.

मनपाकडून शहरातील सातपूर,सिडको, पश्चिम या विभागासाठी सुरु असलेल्या पेस्ट कंटोल ठेक्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत.मुंबई येथील
सूरज एन्ट्रीप्रायजेस,सोबेस्ट सर्व्हिसेस व नाशिक येथील एस अॅण्ड आर या तीन कंपन्या असून त्यांच्या कागदपत्रांची तांत्रिक तपासणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वीच पेस्ट कंट्रोलचा ठेका मार्गी लावण्याचा मलेरीया विभागाचा प्रयत्न आहे. धूर फवारणी ठेक्याची मुदत मागील वर्षी सहा जुलैला संपुष्टात आली होती. महत्वाचे म्हणजे याआधी सहा विभागासाठी एकाच ठेकेदाराकडून धूर फवारणी केली जायची. नंतर यामध्ये बदल करण्यात येउन दोन टप्पे करण्यात आले.
त्यात प्रत्येकी तीन विभाग केले आहे.

मलेरिया विभागाने पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात विभागणी करुन निविदेचे दोन टप्पे केले. पहिल्या ठेक्यात नाशिकरोड, पंचवटी व नाशिक पूर्व चे काम झाले आहे. दिग्विजय एंटरप्रायजेसला ठेका देण्यात आल‍ा. दुसर्‍या विभागाचा ठेकाही मार्गी लागला असताना एक ठेकेदार मनपा विरोधात न्यायालयात गेला होता. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द ठरवण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतररखडलेल्या सातपूर,सिडको, पश्चिमसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. शुक्रवारी निविदा खुल्या करण्यात आल्या. एकूण तीन निविदा प्राप्त झाल्या. आठवडाभरात त्यांची तांत्रिक तपासणी केली जाणार असून अटीशर्तीची पुर्तता केलेली असल्यास ज्याचा दर कमी त्यास पात्र ठरवले जाईल.

एकोणावीस कोटिंचा ठेका
वरील तिन्ही विभागात पेस्ट कंट्रोलसाठी मनपा तीन वर्षासाठी ठेकेदाराला १९ कोटी अदा करेल. पालिका त्यास अौषध पुरवेल. कर्मचार्‍यांचे पगार, डिझेल खर्च ठेकेदाराने करायचा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी