28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्राईममुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्या प्रकरणी सुधाकर बुडगुजर यांच्या...

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्या प्रकरणी सुधाकर बुडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्या प्रकरणी अखेरीस दोन महिन्यांच्या सखोल चौकशी नंतर नाशिक पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बुडगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी असणाऱ्यांची गुन्हे शाखेकडून सलग महिन्यावर चौकशी करण्यात आली होती. या चौकशीचा संपूर्ण अहवाला आयुक्तकडे सादर करण्यात आल्याने याबाबत बडगुजर हे प्रथम दर्शनी दोष आढळून आल्याने व ही पार्टी त्यांच्याच हिंदुस्तान नगर येथील फार्म हाऊस वर झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे आडगाव पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे… याबाबत गुन्हे शाखेचे उपयुक्त याबाबत माहिती देण्यास गोपनीयता बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.. बडगुजर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती… त्यानंतर लगेचच पुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे…
केवळ अन् केवळ राजकीय सुडबुध्दीने मला काही प्रकरणांमध्ये अडकविण्याचे काम केले जात आहे. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. खोटे गुन्ह्यात मला गोवण्याचा प्रयत्न झाला तरी सत्य समोर येईलच. निपक्षपातीपणे कार्यवाही झाली पाहिजे. जिल्हाप्रमुखपद मिळाल्यामुळे ग्रामीण भागातही ठाकरे गटाचा झंझावात निर्माण होऊ शकतो, या भितीपोटी सत्ताधारी गटाने मला डॅमेज करण्याचा प्रकार केला असावा. राजकीय व्देषापोटी सुरू असलेले प्रकार जनता जनार्दन उघडया डोळ्यांनी पाहत आहेत. लोकांना असल्या राजकारणाचा आता व्देष वाटतो आहे. त्यामुळे ते संबंधितांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
– सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी